हेअर कलर करताय ? केस खराब होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

असंख्य केमिकलने भरलेले रंग जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना लावता, तेव्हा केसांची शेड बदलते. पण त्यामुळे ते कोरडे आणि निस्तेजही होतात. हे टाळण्यासाठी केस रंगवताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.

हेअर कलर करताय ? केस खराब होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 1:46 PM

नवी दिल्ली – आजकाल केसांना कलर करण्याचा खूप ट्रेंड आहे. ज्यांचे केस पांढरे (white hair) नाहीत, ते वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना नवा लूक द्यायला आवडतो. यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर रसायने असतात. त्यामुळे अनेक वेळा तुमचे केस खराब होतात. काही केसांचे रंग इतके कठोर असतात की त्यामुळे स्काल्पचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू (hair fall) लागतात. जर तुम्हाला या सर्व समस्या टाळायच्या असतील तर केसांना कलर (hair colour) करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

केसांची रचना समजून घ्या

केसांचे दोन मुख्य भाग असतात – हेअर फॉलिकल आणि केस शाफ्ट. हेअर फॉलिकल्स केसांच्या मुळाशी असतात आणि केसांना स्काल्पशी जोडतात. केसांचा शाफ्ट हा कूपच्या बाहेर वाढतो. केसांच्या कूपांमध्ये जिवंत पेशी असतात, परंतु केसांच्या शाफ्टमध्ये नसतात. केसांमधील रंग मेलेनिनपासून येतो, जो केसांच्या कूपमधील पेशींद्वारे तयार होतो. जेव्हा या मेलेनिनचे उत्पादन कमी होते किंवा थांबते तेव्हा केस पांढरे होतात.

हे सुद्धा वाचा

हेअर कलर किंवा हेअर डाय हा केसांचा नैसर्गिक रंग काढून टाकतो आणि केसांना नवीन रंग देतो. नैसर्गिक आणि सिंथेटिक असे दोन प्रकारचे रंग आहेत, नैसर्गिक रंग मेंदीमध्ये असतात तर कृत्रिम रंग हे कायमस्वरुपी, अर्ध स्थायी आणि तात्पुरते अशा तीन प्रकारात विभागले जाते.

केस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचा घ्या काळजी

1) स्काल्पला रंग लावणे टाळा

केसांना कोणताही रासायनिक रंग लावण्यापूर्वी संपूर्ण स्काल्पला पेट्रोलिअम बेस लावा. यामुळे तुमच्या स्काल्पमध्ये केमिकल शोषले जाण्याचा धोका कमी होईल. जर रंग तुमच्या स्काल्पमध्ये शोषला गेला आणि तुमच्या रक्तप्रवाहात मिसळला गेला तर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. केस डाय केल्यानंतर स्काल्प स्वच्छ धुतले जाईल याची काळजी घ्यावी.

2) मॉयश्चराइज

रासायनिक रंगांमुळे केस हे निस्तेज, कोरडे आणि रफ बनवू शकतात. म्हणूनच केसांना रंग देण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावावे. तसेच केसांना कलर करण्यापूर्वी मॉयश्चरायझिंग कंडिशनर लावणे आणि आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना मॉयश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे.

3) ॲलर्जी टेस्ट किंवा पॅच टेस्ट करावी

तुमच्या केसांसाठी पहिल्यांदाच केमिकल डाय वापरत असाल तर केसांच्या छोट्या भागावर पहिले त्याची चाचणी करा. डाय लावल्यावर जर तुम्हाला खाज सुटणे, डोळ्यांची जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशा समस्या उद्भवली तर हेअर डाय किंवा हेअर कलर बिलकूल वापरू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.