मूड खराब असेल तर ‘हे’ करू नका… अन्यथा तुटू शकतं तुमचं नातं..!

Relationship tips : नोकरीतील ताण, जबाबदारी आणि अनेक प्रश्नांनी तुमचं मन काय विचलित असतं. अनेक वेळा या सगळ्यामुळे तुमचा मूड खराब असतो. नातं खास करून प्रेमाचं नातं हे प्रत्येकासाठी खूप खास असतं. खराब मूडमध्ये तुम्ही जर पार्टनरशी संवाद साधता मग अशावेळी तुमचं भांडण होतं.

मूड खराब असेल तर 'हे' करू नका... अन्यथा तुटू शकतं तुमचं नातं..!
नातेसंबंध/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 11:49 AM

Relationship tips : गेल्या काही दिवसांपासून तुमच्या नात्यात (Relationship) तणाव निर्माण झाला आहे का? आणि याचं कारण तुम्हाला कळत नाही आहे. आयुष्यात अनेक समस्या असतात. नोकरीतील ताण, जबाबदारी आणि अनेक प्रश्नांनी तुमचं मन काय विचलित असतं. अनेक वेळा या सगळ्यामुळे तुमचा मूड खराब (Mood Off) असतो. नातं खास करून प्रेमाचं (Love) नातं हे प्रत्येकासाठी खूप खास असतं. खराब मूडमध्ये तुम्ही जर पार्टनरशी संवाद साधता मग अशावेळी तुमचं भांडण होतं. तुमच्यामध्ये वाद होतात. तुमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. अगदी ते नातं तुटू पण शकतं. आपल्या आयुष्यातील तणाव आपल्या नात्यांवर कधी येऊ देऊ नका. जर तुमचा मूड खराब असेल तर आपल्या पाटर्नरशी संवाद टाळा. यासाठी आज आम्ही तुम्हाला खास टीप्स देणार आहोत.

ही गोष्ट करा आणि नातं सुंदर करा

1. दुसऱ्या गोष्टीत मन रमवा –

जर मूड खराब आहे तुमचा. मग अशावेळी कोणाशीही बोलू नका. तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत रमवा. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करा. ज्या गोष्टीमुळे तुम्ही रिलॅक्स होईल अशा गोष्टी. तुम्हाला संगीताची आवड असेल तर ते ऐका. मोबाइलवर गेम खेळा.

2. कोणाशी तरी संवाद साधा –

एखादी व्यक्ती न बोलता मनातल्या मनात घुटमळत राहते. याचा त्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी पाटर्नरशी बोला. त्यांना आपली अडचण सांगा. अगदी ज्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायला आवडतं ती किंवा त्याचाशी बोला. तुम्हाला सकारात्मक वाटेल अशा व्यक्तीशी बोला. अनेक वेळा बोलू समस्येवर मार्ग निघतो. आई-वडिलांशी संवाद साधा.

3. चांगल्या क्षणांचा विचार करा –

आपल्या आयुष्यात संकट, अडचणी येत असतात. त्या कोणाच्याही आयुष्यातून चुकलेल्या नाहीत. संकट आणि अडचणी जशा येतात तसे काही सुखाचे आणि आनंदाचे क्षणही आपल्या आयुष्यात असतात. जेव्हा नकारात्मक विचाराने आपल्याला घेरलं असतं. अशावेळी या आनंदी, सुखी क्षणांचा विचार करा. मन अगदी प्रसन्न होऊन जाईल.

4. प्रेम आणि नातं –

आयुष्यात अनेक चढउतार येतात. अशावेळी आपली जवळची व्यक्ती आपल्यासोबत खंबीरपणे उभी असते. मूड खराब असला की आपण या व्यक्तीला नको ते बोलून बसतो. आणि नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. मूड खराब असणे, राग आला की आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनाचा विचार करत नाही. आपल्या बोलण्याचा त्यांनीही त्रास होतो. अशातून नाती तुटतात. कायम प्रेम आणि नात्याचा आदर करा.

5. योगा करा –

मन प्रसन्न राहण्यासाठी, मूड कायम छान राहण्यासाठी योगा करा. यातून मूड छान राहतो. आपल्याला प्रसन्न वाटतं आणि त्यातून आरोग्यही छान राहतं.

टीप : या बातमीतील सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, तुमच्यामधील नातं चांगलं व्हावं, हाच या लेखामागील उद्देश आहे.

आणखी वाचा :

मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय

वारंवार पेनकिलर घेताय? वेळीच सावध व्हा… शरीरावर होतात गंभीर परिणाम

जास्त प्रमाणात चपाती खाताय? आताच व्हा सावधान ! ,जाणून घ्या यामुळे होणारे आजार..

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....