Health Care | ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग ही काळजी अवश्य घ्या !

काहींचा पाठदुखीचा त्रास वाढलाय, काहींच्या डोळ्यावर ताण येऊन अंधुक दिसायला लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेणेही आवश्यक आहे. (Do the work from home, then take care)

Health Care | ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग ही काळजी अवश्य घ्या !
10-3-2-1 ट्रिकमध्ये 2 म्हणजे झोपायच्या 2 तास आधी काम करणे थांबवा. डॉक्टर म्हणतात की यामुळे मेंदूला आराम करण्यास वेळ मिळतो. जर तुम्ही झोपायला जाईपर्यंत मेल तपासत राहिलात तर तुम्हाला सहज झोप लागणार नाही.
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 7:19 AM

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गेल्या दोन वर्षांत अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. कोरोना काळात संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा उपाय सर्वात उत्तमच आहे. मात्र तासन्तास एकाच जागी बसून सतत कामात व्यस्त राहण्यामुळे अनेकांना त्रासही सुरू झाला आहे. काहींचा पाठदुखीचा त्रास वाढलाय, काहींच्या डोळ्यावर ताण येऊन अंधुक दिसायला लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेणेही आवश्यक आहे. आपण जर सतत कामच करीत बसलो तर त्याचा आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Do the work from home, then take care)

आपल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी

तुमच्या कार्यालयीन कामाची सुरुवात करण्याआधीच पुरेशी खबरदारी घ्यायला हवी. आपल्या दिवसाची सुरुवात शांत आणि तणावमुक्त दृष्टीकोनातून केली पाहिजे. प्राणायाम किंवा श्वासोच्छवासासंबंधी व्यायाम केले पाहिजेत. यामुळे आपण काम करतानाही तणावमुक्त राहू शकू. याशिवाय व्यायामामुळे कमी रक्तदाब, ह्रदयाचे ठोके आणि डिप्रेशनसंबंधी त्रासाचा धोका कमी होऊ शकेल. प्राणायाममुळे मधुमेह तसेच जुन्या दुखण्यांपासून आराम मिळू शकेल. संबंधित व्यायामामुळे आपले शरिर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त राहण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात ऑक्सिजनचीच नितांत गरज आहे.

चालता चालता चर्चा करा

सध्या बहुतेक ऑफिस मिटिंग्ज कॉन्फरन्स कॉलवर होत आहेत. आपण ‘वर्क फ्रॉम होम’ करताना अधिक वेळ बसून असतो. त्यामुळे कॉन्फरन्स कॉलची वेळ येते, त्यावेळी अशा कॉलवर चालत चालत बोला. यामुळे आपल्या रक्त पुरवठ्यात सुधारणा होऊ शकेल. याशिवाय आपण सतत जे कम्प्युटरकडे बघत असतो, त्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण कमी होण्यासही मदत होते. चालण्यामुळे शरिरात हेल्दी एंडोर्फिन किंवा हॅप्पी हार्मोन रिलीज होतात.

वेल-बीईंग ब्रेक्स

अधून मधून ब्रेक घेतेवेळी स्क्रीन टाईमला काही क्विक स्ट्रेचमध्ये बदला. हे बुद्धी आणि शरिर दोन्हीसाठी फायदेशीर असते. एकाच स्थिती अधिक वेळ बसून शरीरात आलेली उदासिनता हटवण्यासही याची मदत होईल. नेक रोल, साईड स्ट्रेच, बॅक आणि अप्पर बॅक स्ट्रेच, सिटेड हिप स्ट्रेच, स्पाईन ट्विस्ट अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही आपल्या डेस्कवरही करू शकता.

डोळ्यांनाही हवा आराम

आपल्या शरीराच्या इतर अवयवांबरोबरच डोळ्यांनाही आरामाची गरज असते. यासाठी प्रत्येक 20 मिनिटानंतर स्क्रिनपासून दूर पाहण्याचा प्रयत्न करा. 20 सेकंदासाठी 20 फूट दूरवरच्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होईल. (Do the work from home, then take care)

इतर बातम्या

दोन चिमुकल्यांची थेट पंतप्रधानांना साद; शाळा बंद राहिल्यामुळे मुलांनी बनवला धम्माल व्हिडिओ

Video | ‘ड्रममास्टर’ चिमुकलीचे कौशल्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘काय टॅलेंट आहे?’; सोशल मीडिया युजर्सची मने जिंकणारा व्हिडिओ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.