Makar Sankranti 2025: करिअरची प्रगती, संपत्ती वाढ; फक्त मकर संक्रातीला तिळाने करा ‘हे’ उपाय
मकर संक्रांत हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. या दिवशी भगवान सूर्य उत्तरायणाच्या दिशेने वाटचाल करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानकरण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासह अनेक उपायही केले जातात. या उपायांमुळे घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात.
हिंदू धर्मात मकरसंक्रांत हा सण प्रमुख सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या खास दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तुम्हाला शक्य असलेल्या वस्तूंचे दान केल्यास पुण्यफल मिळते, असे हिंदू धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे. या दिवशी भगवान सूर्याची ही पूजा केली जाते.
मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्त्व
यावर्षी सूर्य ग्रह 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. यादिवशी मकर संक्रांत हा सण मोठया उत्साहात साजरा केलं वाजतो. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवून खाण्याचीही परंपरा आहे. या दिवशी भगवान सूर्याला तीळ अर्पण केले जाते. खरं तर मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व आहे. त्याबरोबर काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन रंगांचे तीळ असतात. पण या दिवशी काळ्या तिळाचे महत्त्व जास्त असते.
काळ्या तिळाचे महत्त्व काय?
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान सूर्य आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने काळ्या तिळाचे उपाय प्राप्त होतात. रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. अशावेळी जाणून घेऊया या दिवशी काळ्या तिळासाठी कोणते उपाय करावेत.
तिळाचे उपाय
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरांमध्ये तिळाचे लाडू बनवले जातात. असे मानले जाते की या दिवशी तीळ खाल्ल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी राहते. .
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करताना पाण्यात काळे तीळ मिसळून ते पाणी अपर्ण करावे. असे केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. तुमच्या करिअरची प्रगती होते.
या दिवशी खिचडीचे दान त्यात काळे तीळ मिसळून करावे. असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव या दोघांच्याही कृपेचा वर्षाव तुमच्यावर होतो. त्यामुळे तुमच्या घरात संपत्तीत वाढ होते.
या दिवशी काळे तीळ अर्पण करणे, तीळ खाणे आणि तीळ पाण्यात टाकल्यास विशेष फायदा होतो. असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)