Tulsi Water Benefits : केवळ वजनच नव्हे तणावही होतो कमी, तुळशीच्या पानांचे पाणी पिण्याचे आहेत भरपूर फायदे
Tulsi Water Benefits - हिंदू धर्माच तुळशीचे विशेष महत्व आहे. तुळशीचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : आपल्यापैकी बहुसंख्या लोकांच्या घरात तुळशीचे (Tulsi) रोप असेलच. हे घरात लावणे अतिशय शुभ मानले जाते. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. दररोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. अनेक लोक सकाळी उठल्यावर कोमट पाणी पितात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तुम्ही त्यामध्ये तुळशीची काही पाने टाकून ते पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. तुळशीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया
तणाव होतो कमी
तुळशीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल यांसारखी अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स आढळतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. यासोबतच यामध्ये आढळणाऱ्या काही घटकांमुळे डिप्रेशनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
वजन कमी करण्यास ठरते सहाय्यक
तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याच्या वापराने मेटाबॉलिज्म रेट वाढतो, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि वजन वाढत नाही.
इम्युनिटी बूस्टर
तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ अथवा टॉक्सिन्स बाहेर जातात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध होतो.
पाचन तंत्र मजबूत होते
तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, लूज मोशन च्या समस्येपासूनही आराम मिळतो.
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते . मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पाणी पिए खूप फायदेशीर ठरते.
सर्दी- खोकल्यापासून मिळतो आराम
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्या पानांचे पाणी प्यायल्याने छातीत जमा झालेला कफ निघून जातो. यासोबतच सर्दी आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो.
कसे करावे सेवन
तुळशीचे पाणी सेवन करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी ओतून त्याला उकळी येऊ द्यावी. त्यानंतर त्यामध्ये तुळशीची काही पाने टाका आणि पाणी निम्मे होईपर्यंत उकळावे. नंतर गॅस बंद करावा आणि कोमट झाल्यावर पाणी प्यावे .
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)