दुधात जायफळ पावडर मिसळून प्यायल्याने मिळतात ‘हे’ फायदे, तुम्हाला माहीत आहेत का ?

दुधामध्ये जायफळ पावडर घातल्यास त्याचे अनेक चमत्कारी फायदे आपल्याला होऊ शकतात. दुधात जायफळ टाकल्यामुळे फक्त त्याची चवच वाढत नाही तर आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे देखील प्रदान करते.

दुधात जायफळ पावडर मिसळून प्यायल्याने मिळतात 'हे' फायदे, तुम्हाला माहीत आहेत का ?
दुधात जायफळ पावडर मिसळून पिण्याचे अनेक फायदे
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 2:56 PM

दूध हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. दूध हे पौष्टिकतेने समृद्ध आहे.  त्यामध्ये अनेक जीवनसत्वं, प्रथिनं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दुधामध्ये जायफळ पावडर घातल्यास त्याचे अनेक महत्वाचे फायदे आपल्याला होऊ शकतात. दुधात जायफळ टाकल्यामुळे फक्त त्याची चवच वाढत नाही तर आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे देखील प्रदान करते. दुधात जायफळ पावडर टाकल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. जायफळाचे आरोग्याला होणारे फायदे आश्चर्यकारक आहे. दुधात जायफळ पावडर टाकून पिल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊ.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर:

जायफळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जायफळामुळे इन्सुलिनची पातळी स्थिर राहते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो:

सर्दीमुळे त्रास होत असेल किंवा सर्दी खोकला असेल तर दुधामध्ये जायफळ पावडर मिसळून प्यायल्याने आराम मिळतो बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म जायफळ मध्ये असतो ज्यामुळे शरीराची संक्रमणाशी लढण्याची क्षमता वाढते आणि यामुळे सर्दी खोकला कमी होतो.

पचनसंस्था सुधारते:

जायफळामध्ये दहाक विरोधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात दुधात मिसळून जायफळ पावडर पिल्याने ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट निरोगी राहते.

मानसिक तणाव दूर करते:

मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे. दुधात जायफळ मिसळून पिल्याने मानसिक संतुलन राखण्यास मदत होते आणि मानसिक शांतता देखील मिळते. उदासपणा, चिंताग्रस्त परिस्थिती यामुळे कमी होते आणि मानसिक स्पष्टता वाढते.

हाडे मजबूत करते:

हाडे मजबूत करण्यासाठी दुधात जायफळ टाकून पिल्यास ते फायदेशीर ठरू शकते कॅल्शियम आणि इतर खनिजे जायफळ मध्ये असतात जे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.