सही करताना खाली लाइन का मारतात? असं करणं चूक की बरोबर?; कधी विचार केलाय?
वास्तुशास्त्रानुसार, स्वाक्षरीखाली रेषा ओढण्याची पद्धत तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडते. सरळ, लांब आणि स्पष्ट रेषा आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहेत, तर छोट्या, वळणदार किंवा अनेक रेषा अडचणी आणि गोंधळ दर्शवतात. योग्य रेषा ओढल्यास आयुष्यात सकारात्मक बदल येतात, तर चुकीची रेषा अडथळे निर्माण करू शकते. महत्त्वाचे म्हणजे, रेषा तुमच्या स्वाक्षरीपेक्षा मोठी आणि सरळ असावी.
आपल्या आयुष्यात सही (सिग्नेचर)चं मोठं महत्त्व आहे. सही म्हणजे केवळ आपली ओळख नसते तर आपली विचार करण्याची पद्धत, आपलं व्यक्तिमत्त्व आणि मानसिक स्थितीही त्यातून दिसून येते. विविध लोकांच्या सह्या पाहिल्यावर तुमच्या ते लक्षात येईल. पण यात लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट समान आहे. ती सही करताना जवळजवळ सर्वच जण त्या खाली एक लाईन मारतात. तुम्ही कुणाचीही सही पाहा. बहुतेकांच्या सही खाली एक लाइन मारलेली असते. पण सहीच्या खाली लाईन मारणं योग्य आहे की चूक? या सवयीचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव पडतो का? त्यावर आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. याबाबत ज्योतिषांचं काय मत आहे किंवा ज्योतिष शास्त्रात काय म्हटलंय हे जाणून घेणार आहोत.
सहीच्या खाली लाइन मारण्याची सवय वर्षानुवर्ष सुरू आहे. पण ते खरंच योग्य आहे का ? वास्तूशास्त्राच्या मते, तुम्ही सहीच्या खाली लाइन कशी मारता यावर सर्व निर्भर आहे. लाइनचा आकार, गडद मारलीय की सॉफ्ट आणि लाइनची दिशा कशी आहे यावर बरंच काही अवलंबून आहे. त्यावरूनच तुमच्या आयुष्यावर सकारात्मक की नकारात्मक प्रभाव पडणार हे स्पष्ट होतं.
लांबी आणि दिशा
जर तुम्ही सहीच्या खाली लांब आणि सरळ लाइन मारली तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असल्याचं दिसून येतं. वास्तूशास्त्राच्या मते, लाइन ही सहीपेक्षा मोठी असली पाहिजे. तसेच ती सरळ असली पाहिजे. लाइनमध्ये खंड पडलेला नसावा, ती तिरकस नसावी. तुमची लाइन तुमच्या हस्ताक्षरापेक्षा मोठी छोटी आणि घुमावतर असेल तर तुमच्या आयुष्यात समस्या आणि अडथळे येणार असल्याचं स्पष्ट होतं.
एकापेक्षा अधिक लाइन नको
अनेक लोक सहीच्या खाली एकापेक्षा अधिक लाइन मारतात. वास्तूशास्त्रात ते शुभ मानलं जात नाही. अधिक लाइन मारणं म्हणजे मानसिक भ्रम आणि गोंधळाची परिस्थिती दर्शवणं आहे. अशी सही करणारी व्यक्ती योग्य निर्णय घेत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सातत्याने अडथळे येत असतात.
यशावर परिणाम
सहीच्या खालची लाइन कापली जात असेल किंवा त्यात वळण येत असेल तर वास्तूशास्त्रात ते योग्य मानलं जात नाही. याचा अर्थ व्यक्तीची भरभराट थांबते. म्हणूनच सहीच्या खालची लाइन थेट आणि कोणत्याही वळणाशिवाय खेचली पाहिजे. त्यामुळे जीवनात अडचणी येत नाहीत. यशाचा मार्ग साफ राहतो.
तुमच्यासाठी लाभदायी आहे का?
सहीच्या खालील लाइन मारण्यात केलेला बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण तुम्ही जोपर्यंत ही लाइन योग्य पद्धतीने मारत असाल तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. जर लाइन खूप छोटी, घुमावदार किंवा वेडीवाकडी तसेच गोंधळात टाकणारी असेल तर ही सही तुमच्या जीवनात समस्या येण्याचं कारण होऊ शकतं. त्यामुळेच तुम्हाला जर तुमची सही बदलायची असेल तर लाइन तुमच्या सहीपेक्षा मोठी, सरळ आणि साफ असली पाहिजे. हे पथ्य तुम्ही कायम पाळलं तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येईल.