दारु कधी खराब होत नाही का ? बाटलीवर एक्सपायरी डेट का नसते ?
दारुला कोणताही एक्सापयर डेटचा काही प्रॉब्लेम नसतो असा समज सगळ्यांचा असतो. त्यामुळे इतर पदार्थांची जशी काळजीपूर्वक एक्सायर डेट पाहीली जाते तशी दारुची पाहिली जात नाही. दारु जितकी जुनी तितकी ती मुरलेली आणि चांगली असा समज आहे. परंतू सत्य मात्र वेगळेच आहे. दारु विषयी वेगवेगळ्या धारणा आहेत. त्यात दारु कधीच खराब होत नाही ही एक धारणा आहे.
मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : जगातील प्रत्येक पदार्थांची एक्सपायरी डेट असते. परंतू दारुवर ही गोष्ट लागू होते का ? सर्वसाधारण दारुबाबत एक समज आहे की दारु कधीच खराब होत नाही. दारु जितकी जूनी तितकी अधिक चांगली नशा देणार असे म्हटले जाते. त्यामुळे दारुबाबत अनेक समज आणि गैरसमज पसरले आहेत. या समजूतींमुळे दारु खरेदी करताना लोक दारुची एक्सपायरी डेट आवर्जून पाहात बसत नाहीत. परंतू ही हे संपूर्ण सत्य नाही. दारुची देखील एक्सपायरी डेट असू शकते. ती हानिकारक आणि विषारी देखील होऊ शकते.
दारु कधी खराब होऊ शकत नाही हा समज खोटा आहे. जस जसा वेळ जातो तस तसा काळानूसार ऊन, हवा आणि तापमानामुळे दारु देखील खराब होऊ शकते. जर दारुची बाटली खूपकाळ ऊन्हाच्या संपर्कात आली तर ती बेरंग होऊ शकते. तिचा रंग बदलतो म्हणजे तिच्या चवीत देखील बदल होऊ शकतो. हेल्थ लाईन डॉट कॉम या वेबसाईटच्या मते दारु किंवा मद्य अल्कोहोल पासून तयार होते. केवळ अल्कोहोलचं स्वतंत्रपणे आर्युमान खूप जास्त असते. परंतू अल्कोहोल शिवाय त्यात अन्य पदार्थ देखील मिक्स केलेले असतात. दारु, बिअर आणि वाईन तीन वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात. तिनही प्रकार तयार करण्याची मूळ प्रक्रिया फॉर्मेटेंशन आहे.
व्होडका, व्हीस्की आणि रम
या सर्व अल्कोहोलिक पेय पदार्थांना लिकर म्हटले जाते. या पेय पदार्थांना विविध धान्याला कुजवून तयार केले जाते. ग्रेन्सच्या ( धान्य ) दाण्यांना यीस्ट सोबत फॉर्मेंटेशन करुन तयार केले जाते. जी लिकर जास्तीत जास्त डिस्टील केली जाते ती अधिक उच्च दर्जाची दारु बनते. त्यानंतर ती बाटलीत भरली जाते. त्यामुळे तिचे फॉर्मेंटेशन थांबते. परंतू एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार तुम्ही एकदा बाटली उघडली की 6 ते 8 महिन्यात ती संपवायला हवी. बाटली उघडल्यानंतर दारुची चव आणि कलर दोन्ही बदलायला सुरुवात होते. दारुला थंड आणि अंधाऱ्या जागेत ठेवायला हवे. तुम्ही तिला फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता. अशामुळे दारुचे आयुष्य खूप वाढते.
बियरची पद्धत वेगळी
बियर देखील अन्न कुजवूनच तयार होते. यात पाण्याचा वापर देखील जास्त होतो. एका सिलबंद बियरला 6 ते 8 महिन्यांनी पिता येते. फ्रीजमध्ये तिचे आयुष्य वाढते. अल्कोहोलचे प्रमाण 8 टक्के पेक्षा जास्त असेल तिचे लाइफ जास्त असते.
जुन्या वाईनची चव वाढते
बियर आणि लिकरहून वाईन द्राक्षसारख्या फळांपासून बनते. तिला अनेक वर्षे बाटलीबंद ठेवल्याने तिची चव वाढते. चांगल्या क्वालिटीच्या वाईनचे आयुष्य जास्त असते. परंतू स्वस्तातील वाईन तिच्या मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या दोन वर्षात संपविली पाहीजे. ऑर्गेनिक वाईन म्हणजे ज्यात प्रजर्वेटीव्हचा वापर केलेला नाही तिला तीन ते सहा महिन्याच्या आत संपविले पाहीजे.