तुम्ही कधी स्वप्नात उंचावरून पडला असाल तर ही बातमी एकदा वाचाच… जाणून घ्या!
उंचीवरून खाली पडण्याच्या स्वप्नांच्या संबंधित एक सत्य आहे जे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. अशा वाईट स्वप्नांचा आपल्या जीवनाशी खोल संबंध आहे याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : आपल्याला रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर स्वप्न पडतात. मग काही चांगली स्वप्न असतात तर काही भीतीदायक किंवा वाईट अशी स्वप्न लोकांना पडतात. यामध्येच बहुतेक लोकांना एखादा उंचीच्या ठिकाणावरून किंवा इमारतीवरून पडण्याची भीतीदायक स्वप्न पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का उंचीवरून खाली पडण्याच्या स्वप्नांच्या संबंधित एक सत्य आहे जे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. अशा वाईट स्वप्नांचा आपल्या जीवनाशी खोल संबंध आहे याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हाही उंचीवरून खाली पडण्याची स्वप्न आपल्याला पडतात तेव्हा अशी स्वप्न ही चिंता, तणाव, टेन्शन अशा भावनांशी संबंधित असतात. तसेच स्वप्न ही नातेसंबंधांशी, करिअरशी आणि आर्थिक परिस्थितीशी देखील संबंधित असतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, खाली पडण्याची स्वप्नही भीती, घाबरणारे, तणावाचे संकेत देत असते.
1. लिफ्टमध्ये पडण्याचे स्वप्न
काही लोकांना लिफ्टमध्ये मोठा अपघात झाल्याचे स्वप्न पडतात. अशी स्वप्न पडण्याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक बदल व्हायला लागतो. मग एखाद्या गोष्टीवरील नियंत्रण गमावणे किंवा आपला स्वाभिमान गमावणे सोबतच एखाद्या गोष्टीसाठी आपण चिंतेत असतो त्यावेळी अशा प्रकारचे स्वप्न लोकांना पडू शकतात.
2. एखाद्या कड्यावरून पडण्याचे स्वप्न
बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर एखादा कड्यावरून किंवा एखादा डोंगरावरून खाली पडल्याची भीतीदायक स्वप्न पडतात. ही स्वप्न पडण्याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजीत पडलेला असतो किंवा चिंतेत असतो. तसेच अशा प्रकारचे स्वप्न मैत्री किंवा खोल नातं तुटलेलं असतं तेव्हा पडतात.
3. आकाशातून पडण्याचे स्वप्न
काही लोकांना आकाशातून पडण्याचे देखील स्वप्न पडते. अशी स्वप्न ही नियंत्रण गमावल्याच्या भावनेशी संबंधित असतात. जर आपण एखाद्या गोष्टीबाबत खूपच अस्वस्थ असो किंवा आपल्याला खूप तुटल्यासारखं वाटत असेल तेव्हा अशी स्वप्न पडू शकतात.