The Health Benefits of Beer: बिअर पिणे शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधकांचा दावा
बिअर आंबवलेल्या धान्यापासून बनवली जाते. यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड देखील टाकला जातो. लाईट ड्रिंकच्या शोधात असलेले लोक बऱ्याचदा बियरला प्राधान्य देतात. कारण, याच्या सेवनाने काहींना नशा चढत नाही. तणावातून बाहेर पडण्यासाठी पुरुष मद्यपान करत असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
मद्यपान करणे शरीरासाठी घातक आहे. यामुळे अनेक जण मद्यपानापासून दूर राहतात. मात्र, बिअर पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते असं कुणी तुम्हाला सांगीतल तर? विश्वास नाही बसणार ना. पण बिअर पिणे शरीरासाठी ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. अनेकांचे बियर हे फेव्हरेट ड्रिंक आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. बियर हे देखील एक अल्कोहोलिक पेय आहे. मात्र बियरचे सेवन शरीरासाठी वरदान ठरू शकते असे एका संधोधनातून समोर आले आहे.
बिअर आंबवलेल्या धान्यापासून बनवली जाते. यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड देखील टाकला जातो. लाईट ड्रिंकच्या शोधात असलेले लोक बऱ्याचदा बियरला प्राधान्य देतात. कारण, याच्या सेवनाने काहींना नशा चढत नाही. तणावातून बाहेर पडण्यासाठी पुरुष मद्यपान करत असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
आपण नेहमी ऐकत असतो की, मद्यपान करणं शरीराला हानिकारक आहे. मद्यपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. मद्यपानामुळे नको ते आजार होण्याचीही भिती असते. यामुळे अनेक जण शक्यतो त्यापासून लांबच राहणे पसंत करतात. वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार बीअर पिणं हे शरीरातल्या आतड्यांसाठी फायद्याचे आहे. बीअरमध्ये जुनाट आजारांना रोखण्याची क्षमता असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. पोर्तुगालमधील ‘सेंटर फॉर रिसर्च ईन टेकनॉलॉजिज अँड सर्व्हिसेस’ यांनी हे संशोधन केले आहे.
या संशोधनात 23 ते 58 वय वर्ष असणाऱ्या निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला. या पुरुषांना रोज चार आठवडे त्यांनी 330 मिलीलीटर बीअर पिण्यास दिली. जर्नल ऑफ अॅग्रीकल्चर अँड फूड रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनातून असे समोर आले की, बीअर प्यायल्यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते. तसेच वजन कमी होण्यास मदत करते. आपली पचनशक्ती देखील सुधारते शिवाय बीअरचे सेवन केल्यावर हृदय आणि मेटाबॉलिजम सारखे आजार होत नाहीत.