रिकाम्या पोटी ‘चहा’ पिणे आरोग्यासाठी हानिकारक !

| Updated on: Apr 01, 2021 | 9:59 AM

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते.

रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक !
चहा
Follow us on

मुंबई : बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. मात्र, जास्त चहा पिणे देखील आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. चहामध्ये कॅफिन असते ज्याच्या अधिक सेवनामुळे कर्करोग, अल्सर आणि इतर शारीरक रोगांचा धोका वाढतो. (Drinking tea is harmful to health)

-आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अ‍ॅसिड तयार होते. यामुळे, पोटा संदर्भातील अनेक आजार उद्भवू शकतात. छातीत आणि घशात आंबटपणा, अपचन, पोटात जळजळ यारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

-रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे मळमळ आणि चिंताग्रस्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त बर्‍याच आरोग्य तज्ञांचे मत आहे की दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

-लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होते.

-आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे चहासह अंडी, ऑमलेट खाणे बर्‍याच लोकांना आवडते. हे देखील आपल्या आरोग्यास हळूहळू हानी पोहोचवू शकते.

-तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असाल तर, प्रोस्टेट कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.

-चहामध्ये भरपूर टॅनिन असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे कधीकधी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.

-अति चहा पिणे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे.

-चहाच्या अति सेवनाने आतड्यांवर परिणाम होतो.

-जास्त चहा पिण्यामुळे निद्रानाश होतो.

-चहाच्या अति सेवनाने कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर वाढते.

संबंधित बातम्या : 

(Drinking tea is harmful to health)