तुमची त्वचा पडली कोरडी ?, हे घरगुती उपाय करून पाहाच

पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. या लेखात, घरी बनवता येणारे सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. ऑलिव्ह तेल, एव्होकॅडो मास्क, ओट्स, तूप आणि साखरेचा स्क्रब यासारख्या नैसर्गिक उपचारांचा वापर करून आपण कोरडी त्वचा दूर करू शकतो. तसेच, दूध आणि फळांचे मास्क देखील उपयुक्त ठरतात.

तुमची त्वचा पडली कोरडी ?, हे घरगुती उपाय करून पाहाच
कोरड्या त्वचेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा सोडवाल ?
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 4:52 PM

पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत ड्राय स्किनची समस्या असते. जीवनशैली आणि आहार यामुळे हा आपली त्वचा कोरडी होते. त्यामुळे अनेक उपचार करूनही फरक पडत नाही. पण काही गोष्टी करून पाहिल्या तर फरक पडू शकतो. त्वचेचं कोरडेपण दूर करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात. खालील या उपायांची माहिती दिली आहे. ट्राय करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

ऑलिव्ह तेल

त्वचेला हायड्रेशन मिळवण्यासाठी ऑलिव्ह तेल लावणं फायदेशीर ठरतं. ऑलिव्ह तेलात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि स्क्वालिन असतं. त्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. मात्र, ऑलिव्ह तेल त्वचेला लावण्यापूर्वी एकदा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नाही तर ऑलिव्ह तेलाचा उलटा परिणाम होऊ शकतो. मनाने उपचार घेऊ नका.

ॲवोकॅडो मास्क

त्वचेचं कोरडेपण दूर करण्याचा दुसरा प्रभावी उपाय म्हणजे ॲवोकॅडो मास्क. एवोकॅडोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स असतात. त्या्मुळे त्वचा ताजेतवानी राहते आणि चमकदारही बनते. अर्धा एवोकॅडो आणि एक कप दही मिक्स करून त्वचेला लावा. त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल आणि त्वचेच्या पोताला सुधारणा मिळेल.

तुप आणि साखरेचा स्क्रब

1 कप साखर आणि ½ कप तुप एकत्र करून शरीरावर लावा. एक मिनिटभर स्क्रब केल्यानंतर गोड पाणी वापरून धुवून टाका. त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल.

ओट्स

अंघोळ करताना ओट्स पाण्यात घालून ते पाणी शरीरावर शिंपडा. हा एक चांगला उपाय आहे.

ओट्स आणि मधाचा मास्क

2 चमचे ओट्स, 1 चमचा मध आणि थोडं पाणी एकत्र करून मिक्स करा. 15 ते 20 मिनिटे ते त्वचेवर ठेवा. त्यामुळे त्वचेला हायड्रेशन ठेवण्यास मदत मिळेल.

झोपताना तूप लावा

झोपायला जाण्यापूर्वी शरीरावर तूप लावणे हा एक चांगला उपाय आहे. तूप त्वचेला सॉफ्टनेस आणि आराम देते.

दूध

दूधात लॅक्टिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे त्वचेतील हायड्रेशन टिकवण्यासाठी मदत होते. त्यामुळे लॅक्टिक अ‍ॅसिड आणि सेरामाईड्स असलेले लोशन वापरणे फायदेशीर ठरू शकते.

फळांचे एंझाइम क्लेंझर्स

फळांचा मास्क आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावणे फायदेशीर आहे. पाइनॲपल, पपाया आणि अंजीर यांचे मास्क सर्वोत्तम असते.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.