केस पांढरे झाले? डाय आणि कलरचा टेन्शन सोडून घरच्या घरी करा हे 3 उपाय!
जर तुम्हीही पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर या काही घरगुती उपाय वापर करून तुम्ही तुमचे केस सहज काळे करू शकता. मुख्य गोष्ट अशी आहे की ते हानिकारक देखील नाहीत. तर आजच वापरून पहा!

केस पांढरे होणे हे वाढत्या वयाचे एक सामान्य लक्षण मानले जाते, पण फक्त वयामुळेच नाही, तर विविध केमिकल्स असलेल्या उत्पादनांच्या वापरामुळेही केस लवकर पांढरे होऊ शकतात. बाजारात अनेक प्रकारचे केसांचे रंग उपलब्ध असले तरी, त्यांचा वापर केल्यास तुमच्या केसांना हानी होऊ शकते. पण चिंता करण्याची गरज नाही! घरच्याघरी उपलब्ध असलेल्या निसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. घरगुती उपायांचा फायदा लगेच दिसत नसला तरी, नियमितपणे हे उपाय हफ्त्यातून दोन किंवा महिन्यातून दोन वेळा केल्याने परिणाम दिसायला लागतात. हे निसर्गिक उपाय हानिकारक रसायनांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत. चला, जाणून घ्या असे काही सोपे उपाय, जे तुमचे केस काळे आणि सुंदर बनवतील!
१. मेथी दाणे आणि मेंदी
पांढऱ्या केसांसोबतच कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत फायदेशीर ठरतात. मेंदीच्या पॅकेटमध्ये मेथीचे दाणे मिसळा आणि त्यात घाला. आता या मिश्रणात ४ चमचे लिंबाचा रस, २ कच्ची अंडी, एक चमचा मेथीची पावडर आणि थोडे चहाच्या पानांचे पाणी मिसळा. हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ती पेस्ट केसांना लावा आणि सुमारे एक तासानंतर धुवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल, तसेच कोंड्याची समस्या देखील दूर होईल.
२. कढीपत्ता आणि खोबरेल तेल
कढीपत्त्यात ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे केसांसाठी अत्यंत लाभकारी ठरते. कढीपत्ता धुवून बारीक वाटून घ्या आणि त्यात कोमट खोबरेल तेल घाला. हे मिश्रण तयार करून ते केसांना लावा. आठवड्यातून दोन वेळा हे उपाय केल्यास, त्याचा प्रभाव लवकर दिसू लागेल.




३. बीटरूट हेअर डाई
जर तुमचे केस खूप राखाडी झाले असतील तर बीटरूटचा नैसर्गिक रंग तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतो. बीटरूट बारीक करून त्याचा रस काढा आणि त्यात कोमट नारळ किंवा ऑलिव्ह तेल घाला. पेस्ट थंड झाल्यावर ती केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक रंग मिळेल आणि ते अधिक सुंदर दिसू लागतील.
अशा प्रकारे, घरच्याघरी निसर्गिक उपायांचा वापर करून तुम्ही केस काळे आणि सुंदर बनवू शकता. लक्षात ठेवा, हे उपाय हफ्त्यातून दोन किंवा महिन्यातून दोन वेळा केल्यास परिणाम दिसू लागतात, आणि तुम्ही रासायनिक उत्पादनांपासून दूर राहून निसर्गाचा फायदा घेऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)