Fitness | अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी जिमची गरज नाही! घरच्या घरी करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार…
अवेळी खाण्याची सवय आणि बाहेर पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
मुंबई : दैनंदिन जीवनात बहुतेक लोक त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. अवेळी खाण्याची सवय आणि बाहेर पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरूवात होते. ही चरबी शरीरावर विशेषत: मांडी, पोट आणि हिप्स या भागांवर जमते. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. आपल्यालाही शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल आणि त्यासाठी जिमला जाण्याचा विचार करत असाल, तर थांबा! यासाठी जिम किंवा व्यायाम शाळेत जाण्याची गरज नाही. घरच्या घरीच काही सोपे व्यायाम करून तुम्ही शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवू शकता (Easy exercise at home can help you to burn fat).
साइड लिफ्टिंग डबल लिफ्ट लेग
स्टेप 1: शरीराच्या एका कुशीवर सरळ रेषेत झोपा.
स्टेप 2: पायाची बोटे एकत्र ठेवून पाय स्ट्रेच करा..
स्टेप 3: हळू हळू दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला. लक्षात ठेवा की, दोन्ही पाय एकत्र चिकटलेले पाहिजेत.
स्टेप 4: किमान 2 सेकंद या स्थितीत रहा. याप्रकारे किमान ते 5 ते 10 सेट करा.
बेडूक उडी / फ्रॉग जंप
स्टेप 1: खांद्याच्या रेषेत दोन्ही पाय सरळ ठेवा.
स्टेप 2: खाली वाकत असताना आपले दोन्ही हात समोर ठेवा.
स्टेप 3: आता बेडकाप्रमाणे पुढे सरका आणि उडी मारा.
स्टेप 4: उडी मारल्यानंतर, गुडघे वाकवा आणि हिप्सवर बसा (Easy exercise at home can help you to burn fat).
कर्टसी लंज्स
स्टेप 1: सर्व प्रथम सरळ उभे रहा. हिप्स आणि पायांदरम्यान अंतर ठेवा.
स्टेप 2: आपला डावा पाय हळू हळू उजव्या बाजूला न्या. या स्थिती आपली मांडी क्रॉसच्या रूपात दिसेल.
स्टेप 3: हाताचे तळवे जोडताना दोन्ही गुडघे खाली वाकवा.
स्टेप 4: आपल्या उजव्या पायाने याच पद्धतीची पुनरावृत्ती करा.
ग्लूट किकबॅक
स्टेप 1: आपल्या खांद्यांना खाली आणि पायांना वरच्या बाजूस ठेवा.
स्टेप 2: हळू हळू आपला पाय वर न्या आणि किक मारा.
स्टेप 3: काही सेकंदांसाठी याच स्थितीत रहा.
स्टेप 4: हीच प्रक्रिया पुन्हा दुसर्या पायाने करा.
(Easy exercise at home can help you to burn fat)
(टीप : कोणत्याही कृती पूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे)
हेही वाचा :
Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!https://t.co/92c5ukE4R4 #Health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020