घरच्या घरी पिझ्झा बनवण्यासाठी सोप्या टिप्स
मुंबई : पिझ्झा म्हटलं की तुम्हा-आम्हा सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मोठ्या शहरांमध्ये तर प्रत्येक पिझ्झा शॉपमध्ये मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन तरुणाईची गर्दी दिसते. मात्र पिझ्झाची किंमत खिशाला परवडणारी नसते. शिवाय अनेक पिझ्झा शॉपमध्ये वापरले जाणारे पदार्थ हे ताजे नसल्याचं बऱ्याचद्या समोर आलं आहे. पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या, चीज, ब्रेड हेदेखील ताजे नसतात. त्यामुळं असे पदार्थ खाऊन अनेकजण आजाराही पडतात. मात्र पिझ्झाप्रेमींना आता […]
मुंबई : पिझ्झा म्हटलं की तुम्हा-आम्हा सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मोठ्या शहरांमध्ये तर प्रत्येक पिझ्झा शॉपमध्ये मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन तरुणाईची गर्दी दिसते. मात्र पिझ्झाची किंमत खिशाला परवडणारी नसते. शिवाय अनेक पिझ्झा शॉपमध्ये वापरले जाणारे पदार्थ हे ताजे नसल्याचं बऱ्याचद्या समोर आलं आहे. पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या, चीज, ब्रेड हेदेखील ताजे नसतात. त्यामुळं असे पदार्थ खाऊन अनेकजण आजाराही पडतात. मात्र पिझ्झाप्रेमींना आता घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा पिझ्झा बनवता येणार आहे. चविष्ट आणि आरोग्यास उपयुक्त असलेला पिझ्झा घरच्या घरी बनवण्यासाठी खास टिप्स-
कसा बनवाल पिझ्झा ब्रेड?
एक कप गरम पाणी, एक चमचा मैदा, 2 कप पीठ (तुम्हाला आवडेल ते/सोईनुसार पीठ), एक चमचा साखर, तीन चमचे तेल आणि एक चमचा मीठ
पद्धत- एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या. एक चमचा साखर टाकून त्याचे मिश्रण करा. त्यात मैदा घालून पाच मिनिटांसाठी सोडून द्या. थोड्या वेळाने उकळी आल्यानंतर, एक मोठा बाऊल घेऊन, त्यात साखर, मैदा, मीठ आणि पीठ एकत्र करा आणि गरम पाणी टाकून त्याचे चांगले मिश्रण करुन व्यवस्थित मळून घ्या. 30 मिनीटं मळून झाल्यावर पीठ हाताने चेक करा पूर्णपणे मऊ झाले असल्यास, तुमचा पिझ्झा ब्रेड तयार झालेला असेल.
यानंतर पिझ्झा ब्रेडच्या आकाराचा रोल लाटून घ्या. तो रोल ब्रेड 250 ते 300 डिग्रीच्या तापमानात बेक करुन घ्या आणि त्यावर थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत बेक करा आणि तेल लाऊन थंड होईपर्यंत ठेवा.
तुमचा ब्रेड पूर्णपणे तयार झाल्यावर त्यावर पिझ्झा सॉस लावून घ्या. ( पिझ्झा सॉस सहज बाजारात मिळतो) जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल, तर तुम्ही घरातही टोमॅटोपासून सॉस बनवू शकता. त्यावर तुम्ही किसलेले चीज अथवा मोझारेला चीज टाका. यानंतर तुम्ही कांदा, शिमला मिरची, मका, चिकन किंवा पनीर टाकून पुन्हा चीज टाकून 200 डिग्रीच्या तापमानाखाली बेक करा. किमान 5 ते 10 मिनिटे बेक करा, त्यावरील चीज हे पूर्णपणे मेल्ट झाल्यावर बाहेर काढा. पिझ्झा बाहेर काढून थोडावेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतर व्यवस्थित बेक झाला आहे का चेक करुन त्यावर चीज लावा. अशाप्रकारे तुमच्या आरोग्याला उपयुक्त ठरणारा पिझ्झा तुम्ही घरातही बनवू शकता.