Health Benefits Of Jackfruit : फणस खा अन् आजार पळवा; विविध व्याधींवर उपयुक्त फळ

यात कॅल्शियम, नियासिन, पोटॅशियम, आयरन, फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए, सी आणि बी-6, थायमिन आणि रायबोफ्लेविन यांसारखी विविध पोषकतत्त्वे असतात. ही पोषकतत्त्वे आपल्या शरीरातील विविध व्याधी पळवून लावतात. (Eat jackfruit and get rid of the disease; Fenugreek is useful in various ailments)

Health Benefits Of Jackfruit : फणस खा अन् आजार पळवा; विविध व्याधींवर उपयुक्त फळ
फणस खा अन् आजार पळवा
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:06 AM

मुंबई : उकाड्याचे दिवस आले की आपण रसाळ फळांचा शोध सुरू करतो. यातही अनेकांची पहिली पसंती असते ती आंब्याला. पण याच सोबतीला कोकण परिसरात सहजासहजी उपलब्ध होणारा फणसही खायला पाहिजे. वरून काटेरी असणारा फणस आतून मधाळ असतो. अर्थात खाण्यासाठी चविष्ट असणारा हा फणस आरोग्याची काळजी घेण्यासही तितकाच उपयुक्त आहे. फणस अन्य फळांच्या तुलनेत आकाराने मोठा असतो. गरमीमध्येच फणस खायला मिळतो. फणसाच्या गऱ्यांमध्ये प्रोटीन आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते. यात अनेक पोषकतत्त्वे असतात. यात कॅल्शियम, नियासिन, पोटॅशियम, आयरन, फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए, सी आणि बी-6, थायमिन आणि रायबोफ्लेविन यांसारखी विविध पोषकतत्त्वे असतात. ही पोषकतत्त्वे आपल्या शरीरातील विविध व्याधी पळवून लावतात. (Eat jackfruit and get rid of the disease; This is useful in various ailments)

बद्धकोष्ठतेपासून दिलासा

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, अशा लोकांनी फणस अवश्य खायला पाहिजे. फणसात फायबर असतात. याची बद्धकोष्ठतेचा त्रास रोखण्यास मोठी मदत होते. फणस खाण्यामुळे पचन प्रक्रिया योग्यरित्या होते.

रक्तदाबावर नियंत्रण

फणसामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि व्हिटॅमिन सी, बी-6 असतात. याची रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी मोठी मदत होते. यामुळे ह्रदयही आरोग्यदायी राहते, ह्रदयासंबंधी आजार होत नाहीत, ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. अर्थात ह्रदयविकार तसेच ह्रदयाचे झटके रोखण्यासाठी फणस मदत करतो.

हाडे मजबूत बनवण्यासाठी

फणसामध्ये मॅग्निशियम आणि कॅल्शियम असतात. याची आपल्या शरिराची हाडे मजबूत बनवण्यासाठी उपयुक्तता आहे. तसेच ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठीही फणसातील मॅग्निशियम आणि कॅल्शियमचा उपयोग होतो.

अ‍ॅनिमिया रोखण्यासाठी

फणसात आयरनचे प्रमाण अधिक असते. याचा अ‍ॅनिमिया रोखण्यासाठी बराच फायदा होतो. आयरनच्या पुरेशा प्रमाणामुळे लाल रक्तपेशींचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शरिरात पुरेसे रक्त नसल्यामुळे आपल्याला थकवा येतो, थोडे चाललो तरी थकून हातपाय गळून जातात. अशा लोकांनी फणस अवश्य खायला पाहिजे. कारण फणस खाण्यामुळे आपल्या शरिरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी

फणसात व्हिटॅमिन ए असते, हे पोषक तत्त्व आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त असते. मोतिबिंदू, रात्री कमी दिसणे अशा डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी फणस खाणे फायदेशीर ठरेल.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी

फणसामध्ये अ‍ँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण असते. यामुळे त्वचा, पोट आणि तोंडाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मोठी मदत होते. फणसात व्हिटॅमिनचे फायबर आणि मँगनीज असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

इम्युनिटी वाढवण्यासाठी

फणसात व्हिटॅमिन सी आणि अ‍ँटीऑक्सिडेंट असते. याची आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते. हे वायरल आणि बॅक्टीरियल संसर्ग रोखण्याचे काम करते. यामुळे सर्दी, खोकला अशा विविध त्रासांपासून दिलासा मिळतो. (Eat jackfruit and get rid of the disease; This is useful in various ailments)

इतर बातम्या

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर

‘काँग्रेसनं कोरोना योद्ध्यांचं मनोधैर्य खच्ची करु नये’, भाजपाध्यक्ष नड्डा यांचं सोनिया गांधींना पत्र

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.