हिवाळ्यात ‘या’ बिया ब्रेकफास्टपूर्वी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढेल….
Benefits of Seeds: बियाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बियाण्यांमध्ये प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. विशेषतः हिवाळ्यात बियाण्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. बियाण्यांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि शरीरातील उर्जा नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासोबतच बियाण्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व तुमची त्वचा आतून निरोगी ठेवतात, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम राहते.
हिवाळ्यात निरोगी शरिरासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचा आहे. थंडीमध्ये लहानसहान निष्काळजीपणामुळे अनेकवेळा शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हिवाळ्यात तुमच्या आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळेल आणि उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे तुमचे शरीर उबदार राहाण्यास मदत होईल. हिवाळ्यात काही बियाणांचे सेवन तुमच्यया शरीरासाठी फायदेशीर ठरतात. अनेक घरांमध्ये विविध बियांणांचा वापर करून लाडू तयार केले जातात. त्या लाडूमध्ये गुळाता वापर देखील केला जातो. ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास मदत होते.
हिवाळ्यामध्ये बियाण्याचे तुमच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे तुमच्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात. बियाणांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. या बियाणांचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुम्ही या बियांचे सेवन कच्च्या किंवा भाजून खाऊ शकता. बियाणे भाजून खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बियाणे भाजून खाल्ल्यामुळे त्यांच्यामधील पोषक द्रव्य तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पोषण देतात. हिवाळ्यात तुमच्या आहारामध्ये बियाणांचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला फ्लॅक्ससीड्स, ओमेगा ३ फॅटी भरपूर प्रमाणात आढळतात.
फ्लॅक्ससीड्स :- फ्लॅक्ससीड्स बियाण्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फ्लॅक्ससीड्सचं सकाळी ब्रेकफास्टमध्ये सेवन केल्यास तुमच्या हाडांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फ्लॅक्ससीड्समधील हेल्दी फॅटी अॅसिड्स तुमच्या त्वेचं आरोग्य निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुम्हाला पिंपल्स आणि मुरुमा सारख्या समस्या असतील तर तुम्ही फ्लॅक्ससीड्सचं सेवन करू शकता. फ्लॅक्ससीड्समधील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड तुमच्या शरीरामध्ये कोलोजनचे जास्त प्रमाणात उत्पादन करतं ज्यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण राहाते.
चिया सिड्स :- वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स अत्यंत फायदेशीर ठरतात. चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले राहाते. चिया सिड्समध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण करतात. चिया सिड्समध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते आणि पचन सुधारते. चिया सिड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
भोपळा बिया :- भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. भापळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स असतात. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील पोषण तुमच्या स्नायूंपर्यंत पोहोचण्यास मदत होते. भापळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि चेहरा चमकदार होण्यास मदत होते.