World Thyroid Day 2021 | थायरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हे पाच पदार्थ खा

युरोपियन थायरॉईड असोसिएशन आणि अमेरिकन थायरॉईड असोसिएशनने 25 मे 2008 रोजी जागतिक थायरॉइड दिवसाची स्थापना केली होती. (Eat these five foods to get rid of thyroid problems)

World Thyroid Day 2021 | थायरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हे पाच पदार्थ खा
थायरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हे पाच पदार्थ खा
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 7:45 AM

मुंबई : थायरॉईड आपल्या शरीरातील एक हार्मोन आहे, जो सामान्य विकास आणि मेटबॉलिज्म संतुलनाचे काम करतो. ज्यावेळी हे हार्मोन असंतुलित होतात, त्यावेळी त्याचा आपल्या शरीराच्या वजनावर आणि एनर्जी एक्सपेंडिचरवर परिणाम होतो. थायराईडमधील असंतुलनामुळे हायपोथायरायडिज्म, हायपरथायरायडिज्म आणि थायरॉयडिटिस यांचा त्रास होऊ शकतो. परिणामी, शारिरीक बदल घडून थकवा, केस गळणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, अनियमित मासिक पाळी अशाप्रकारच्या विविध त्रासांचा सामना करावा लागू शकतो. (Eat these five foods to get rid of thyroid problems)

याच शारिरीक व्याधींबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक थायरॉइड दिवस साजरा केला जात आहे. अर्थात थायरॉईडसंबंधी व्याधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणाला पुरेशी काळजी घेऊनच या व्याधींपासून सुटका मिळवायची आहे. युरोपियन थायरॉईड असोसिएशन आणि अमेरिकन थायरॉईड असोसिएशनने 25 मे 2008 रोजी जागतिक थायरॉइड दिवसाची स्थापना केली होती. आपण काही विशिष्ट प्रकारची फळे खाऊन थॉयरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवू शकतो.

केळी

केळी हे बेरीचे एक रुप आहे. केळीला सूपरफूड म्हणूनही मानले जाते. यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. दिवसातून किमान एकदा केळे खाल्ल्यास थॉयरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवता येईल. केळे खाल्ल्यामुळे पोट बऱ्यापैकी भरल्यासारखे वाटते. ज्यावेळी तुम्हाला काहीतरी खावेसे वाटेल, त्यावेळी नाश्त्याच्या रुपात केळे खाण्यास प्राधान्य द्या.

खिचडी

थॉयरॉईडचा त्रास टाळण्यासाठी पोटाचे आरोग्य अर्थात पोटाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या पोटातील गडबड अर्थात पोटाच्या आरोग्यातील असंतुलन थॉयरॉईड हार्मोनवर परिणाम करू शकते. त्यामुळे खिचडी खा आणि आपल्या पोटाचे आरोग्य सांभाळा. खिचडी तुमच्या पोटातील गडबड रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करते.

चण्याची डाळ

चण्यामध्ये प्रोटीन, आयरन, जिंक असतात. या सर्व घटकांची थॉयरॉईडच्या नियंत्रणात महत्त्वपूर्ण मदत होते. दक्षिण भारत, बिहार, छत्तीसगड आणि देशाच्या इतर काही ठिकाणी रसम, डाळ आणि सूपच्या रुपात चण्याच्या डाळीचे सेवन केले जाते.

केसर

केसर रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याउठल्या भिजत ठेवलेल्या या केसरचे सेवन करा. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना थॉयरॉईडचा त्रास टाळता येईल. किंवा आधीच हा त्रास झाला असल्यास त्यापासून वेळीच सुटका मिळवता येईल. केसरचे दूधासोबत सेवन करणे हा सर्वोत्तम पर्याय असेल. कारण या माध्यमातून आपल्या शरिराला कॅल्शियम आणि प्रोटीनसुद्धा मिळतील.

फ्राय केलेली मच्छी

थॉयरॉईडच्या त्रासात भाजलेली मच्छी खाणे हादेखील एक आरोग्यदायी पर्याय ठरेल. या पर्यायाचा अधिक परिणाम अनुभवायचा असेल तर रात्रीऐवजी दिवसा फ्राय केलेली मच्छी खाण्यास प्राधान्य द्या. (Eat these five foods to get rid of thyroid problems)

इतर बातम्या

“वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर प्रकल्प मुंबईच्या विकासात महत्त्वाचे”

अखेर ‘त्या’ विधानावरून आदित्य नारायणनं मागितली अलिबागकरांची माफी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.