Vitamin-C Foods: व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी खावेत हे पदार्थ

शरीरात व्हिटॅमिन- सी चा कमतरता असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सर्दी- खोकला असे आजार होऊ लागतात. आहार काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटमिन-सी ची कमतरता दूर करू शकता.

Vitamin-C Foods: व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी खावेत हे पदार्थ
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 1:49 PM

नवी दिल्ली – चांगल्या आरोग्य हवे (good health) असेल तर त्यासाठी अनेक जीवनसत्त्वे (vitamins) आवश्यक असतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे आजार बळावू शकतात. मात्र, योग्य आहार घेऊन व्हिटॅमिन्सची ही कमतरता भरून काढता येऊ शकते. आज आपण व्हिटॅमिन-सी (vitamin-C) बद्दल जाणून घेऊया, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमि-सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे सर्दी-खोकला, सर्दी आणि इतर अनेक प्रकारचे संक्रमण टाळणे शक्य होते. व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, हे जाणून घेऊया.

1) ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. तसेच त्यामध्ये कॅल्शियअम, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-ए आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ब्रोकोली खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

हे सुद्धा वाचा

2) संत्रं

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. तसेच फायबर, व्हिटॅमिन-ए, पोटॅशिअम यासह इतर अनेक पोषक घटकही आढळतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही रोजच्या आहारात संत्र्याचे सेवन करू शकता किंवा त्याचा रस देखील पिऊ शकता.

3) आवळा आवळा हा चवीला आंबट आणि तुरट असला तरी तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन-सी यासह फायबर, पोटॅशिअम, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कच्चा आवळाही खाऊ शकता. किंवा तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता.

4) भोपळी मिरची

भोपळी मिरचीमध्ये भरपूर पोषक तत्वं असतात. त्यात व्हिटॅमिन-सी, ए, के आणि बीटा कॅरोटीन हे देखील असते. भोपळी मिरचीच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर होते. सॅलॅड, भाजी किंवा इतर पदार्थांच्या स्वरूपात तुम्ही भोपळी मिरची खाऊ शकता.

5) स्ट्रॉबेरी एक चविष्ट असे फळ असलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. स्ट्ऱॉबेरी ही कोलेस्ट्रॉलची समस्या टाळते. त्यामध्ये व्हिटॅमिन-सी सोबत फायबर, पोटॅशिअम, फोलेट असते. जे अनेक आजारांवर उपचार करण्यास फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.