हिमोग्लोबिन झालंय कमी ? ‘हे’ पदार्थ खाणं ठरेल फायदेशीर
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्य पातळीवर असणे फार महत्वाचे असते, अन्यथा चक्कर येणे व आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
नवी दिल्ली – जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे (hemoglobin) प्रमाण कमी असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात लोहाची (iron deficiency) कमतरता आहे. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणे आणि कोणतेही काम नीट न करता येणे असा त्रास जाणवू लागेल. जर तुम्हाला हिमोग्लोबिनची पातळी सामान्य ठेवायची असेल, तर ज्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे. आजकाल भारतात अनेक लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. आहाराद्वारे हिमोग्लोबिनची पातळी काही प्रमाणात वाढवता येऊ शकते, मात्र शरीरात त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थांचे (food) सेवन करावे, ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
राजगिऱ्याची पाने
जर तुम्हाला लोहाचा चांगला स्त्रोत हवा असेल तर राजगिऱ्याच्या पानांचे सेवन करावे. ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची लेव्हल वाढण्यास मदत होते तसेच लाल रक्तपेशीही वाढतात.
मनुका
मनुका ह्या लोह आणि तांब्याचा चांगला स्रोत आहेत. त्यांचे सेवन हे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास तसेच लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास खूप फायदेशीर ठरते.
खजूर
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी खजूर हा उत्तम पर्याय आहे. खजूरमध्ये लोहाचे प्रमाण इतके असते की ते केवळ तुमच्या दैनंदिन लोहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. खजूर खाल्याने ॲनिमियासारखे आजार टाळता येतात.
तिळाच्या बिया
तिळाच्या बियांमध्ये शरीरासाठी फायदेशीर असे लोह, फोलेट, फ्लेव्होनॉइड्स विविध पोषक घटक असतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते तसेच शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)