केळ्यामुळे वजन वाढतं की कमी होतं ? जाणून घ्या माहिती
कॅल्शिअमयुक्त असलेलं केळं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. मात्र केळ खाल्याने वजन कमी होतं की वाढतं, याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असतो.
नवी दिल्ली – शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक भाज्या आणि फळांचे (fruits and vegetables) अधिक सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. फळं आणि भाज्यांकडे आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहिले जाते. केळंही (banana) त्यापैकीच एक आहे, पण केळी किती आरोग्यदायी असतात? केळं खाल्याने वजन कमी होतं की वाढतं (weight gain or weight loss), याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो. केळं व दूध एकत्र खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते, असा दावा काहीजण करतात, तर काही लोकांच्या मते केळी खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते.
मात्र वजन कमी करणे आणि वजन वाढणे या दोन्ही स्थितींमध्ये केळ्यामुळे कॅल्शियम मिळते. केळ खाल्याने वजन कमी होतं की वाढतं, हे जाणून घेऊया.
केळं खाल्याने नक्की काय होतं ?
केळं हे एक असं वैविध्यपूर्ण फळ आहे, जे वजन कमी करण्यासाठी मर्यादित प्रमाणात खाता येऊ शकते. पोटभर जेवण करण्याऐवजी नाश्ता म्हणून केळं खाता येऊ शकतं. केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्याच्या सेवनाने अनावश्यक कॅलरीज टाळता येतात. मध्यम आकाराचे केळं खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
केळ्यामध्ये हाय कॅलरी, कार्ब आणि साखर असते, सटरफटर स्नॅक्स खाण्यापेक्षा केळं खाण हा चांगला पर्याय ठरतो. त्यामध्ये असलेले फॅट्स हे वजन कमी करण्यासाठी तसेच आणि वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे. केळ्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.
वजन कमी करण्यासाठी कसं खावं केळं ?
केळ्यामध्ये हाय सेन्सिटी इंडेक्स आणि फायबर असते. ब्रेकफास्ट करताना किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी केळं खाणं फायदेशीर ठरते. केळं खाल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं.
वजन वाढवण्यासाठी केळं कसं खावं ?
केळ्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात, त्यामुळे वजन वाढवण्यासाठी केळं खाणं हा उपाय बऱ्याच काळापासून केला जातो. वजन वाढवण्यासाठी त्याचा आहारात नियमित समावेश करा. ते स्मूदी आणि मिल्कशेकच्या स्वरूपातही सेवन करता येतं. मात्र केळ्याचे नियमितपणे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)