थंडीमध्ये गरम मसाल्याचे अधिक सेवन आरोग्यासाठी धोकादायक, काय आहे कारण ?
हिवाळयात स्वयंपाकघरात खडे मसाल्यांचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. तर दुसरीकडे शरीर उबदार राहण्यासाठी देखील जेवणात खडे मसाल्यांचा वापर केला जातो. त्यांच्या नियमित सेवनाने थंडीत हंगाम आजारांपासून शरीर सुरक्षित राहते तसेच शरीरात ऊर्जा ही राहते. पण त्यांचा अतिवापर शरीरासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्यातील प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खायला खूप आवडतात. जेवणात वापरले जाणारे मसाले पदार्थांची चव आणखीन वाढवतात, म्हणून मसाले हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे बहुतेक मसाले गरम मसाले असतात. औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या या मसाल्यांचा वापर हिवाळ्यात अधिक प्रमाणात केला जातो. दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि वेलची सारखे मसाले शरीराला उबदार ठेवण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे सर्दी-खोकल्यापासून शरीराचे संरक्षण होते. म्हणून थंडीच्या दिवसात हे गरम मसाले आपण अनेक पदार्थांमध्ये वापरत असतो.
दिल्लीच्या श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे व वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन डॉ. अरविंद अग्रवाल सांगतात की, हिवाळ्यात काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि तमालपत्रांचा वापर शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण मसाल्यांचा अतिवापर तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतो. या मसाल्यांचा शरीरावर काय वाईट परिणाम होऊ शकतो हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
डॉ. अरविंद अग्रवाल यांच्यानुसार जास्त गरम मसाले पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. तसेच तुमच्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यापैकी तुमच्या जेवणात या मसाल्यांचा जास्त वापर झाल्याने चयापचय कमी होईल, ज्यामुळे अन्नाचे पचन होण्यास उशीर होईल. ज्याने तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात.
घशात जळजळ होणे
काळी मिरी आणि लाल मिरची सारखे जास्त मसाले तम्ही जेव्हा जेवणात वापरता त्यानंतर हे पदार्थ खाल्ल्याने घशात जळजळ आणि तोंड आतून लालसर होऊ शकतो. याशिवाय तोंडात बारीक फोडही येऊ शकतात. तसेच ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांच्यासाठी दालचिनी आणि लवंगाचे अधिक वापर केलेल्या पदार्थांचे सेवन धोकादायक ठरू शकते. हे मसाले रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करतात, ज्यामुळे समस्या गंभीर होऊ शकते.
ॲलर्जीदेखील होऊ शकते
आहारात जर जास्त गरम मसाले वापरून एखादा पदार्थ बनवला आहे आणि तुम्ही त्याचे सेवन केले तर तुम्हाला त्वचेची ॲलर्जी, खाज सुटणे, पुरळ येणे किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. कारण गरम मसाले हे शरीरात अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय आहारात मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा समावेश केल्याने लिव्हर आणि किडनीवर ताण येतो. अशा वेळी या गोष्टी लक्षात घेऊन गरम मसाल्यांचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
या गोष्टी लक्षात ठेवा
थंडीच्या दिवसात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. फळे आणि भाज्या आणि फायबरसह जास्तीत जास्त पदार्थांचे सेवन करा. तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा. नियमित पणे ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. यासोबतच तुमच्या लाईफस्टाईल रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश करा. अश्याने थंडीच्या दिवसात तुम्ही एकदम तंदुरुस्त व निरोगी रहाल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)