Egg Benefits | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? थांबा, पिवळ्या बलकाचे ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात.
मुंबई : लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे अंडी खायला आवडतात. वास्तविक, अंडे शरीरासाठी खूप लाभदायी असते. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी ठरतात (Egg Yolk are most important for human body).
अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. बऱ्याचदा व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग बाजूला काढूनच अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात. उलट त्या पिवळ्या भागामध्ये बरेच काही साामावलेलं असतं. पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत.
मेंदूच्या सामान्य विकासास मदत
अंड्यांना पिवळ्या बालकाला कोलीनचा मुख्य स्त्रोत मानले जाते, जो आपल्या मेंदूतल्या मुख्य न्युरोट्रांसमीटरपैकी एक, एसिटिल्कोलीनचा एक प्रमुख घटक आहे. आपल्या मेंदूच्या सामान्य विकासासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे.
अँटीऑक्सिडंट बूस्टर
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ओमेगा-3 फॅटसह, अ, डी, ई आणि के ही जीवनसत्त्वे आढळतात.
दृष्टी मजबूत करतात
डीके पब्लिशिंगच्या ‘हिलिंग फूड्स’ पुस्तकानुसार, अंड्यातील पिवळ बलकामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, ल्युटिन आणि झेंथाइन असतात. जे आपल्या डोळ्यांचे रक्षण करतात आणि दृष्टी देखील मजबूत करतात (Egg Yolk are most important for human body).
हृदयरोगापासून बचाव करतात
अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात. यासह, अंड्यांमध्ये अमिनो आम्ल देखील आहेत जे, आपला हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.
जास्त अंडी खाऊ नका!
अंड्याच्या पिवळ्या बलकातील घटक थेट आपल्या हृदयावर परिणाम करतात. तथापि, अद्याप कोणीही याची पुष्टी केलेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते. अंड्यातील पिवळ्या बलकाचा उष्मांक 55 आहे. म्हणून, आपण हिवाळ्यामध्ये अंड्यातील पिवळ्या बलकाचे सेवन शकता. परंतु, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, या उक्तीला लक्षात ठेवून अंड्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. एका दिवसाला आपण केवळ 7-8 अंडी खाऊ शकता.
(Egg Yolk are most important for human body)
सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणेhttps://t.co/3h2V1upR37 #Coronasymptoms #coronavirus #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020