Eid Mehndi Design : ईदच्या निमित्ताने ‘या’ ट्रेंडी आणि स्टायलिश मेहंदी डिझाईन्स, लावा तुमच्या हातावर

ईद सारख्या प्रसंगी अनेक महिलांना हातावर मेहंदी लावायला आवडते. ईदच्या निमित्ताने तुम्हाला काही खास मेहंदी डिझाइन्स लावायच्या असतील, तर तुम्ही नवीन स्टायलिश डिझाईन्सची निवड करू शकता. या डिझाईन्स तुमच्या हातावर खूप सुंदर दिसतील.

Eid Mehndi Design : ईदच्या निमित्ताने ‘या’ ट्रेंडी आणि स्टायलिश मेहंदी डिझाईन्स, लावा तुमच्या हातावर
मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा हे उपायImage Credit source: fabbon
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:18 PM

बकरीद किंवा ईद अल-अधा (Bakrid or Eid al-Adha) हा इस्लामचा एक महत्त्वाचा सण मानला जातो. हा दिवस बलिदानाचा म्हणूनही पाळला जातो आणि काही लोक त्याला मोठी ईद असेही संबोधतात. बकरी ईद रोजी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात. ईद अल-अधा 10 जुलै रोजी रविवारी साजरी केली जाईल. हा उत्सव आदल्या दिवशीच्या सूर्यास्तापासून सुरू होतो. ‘बलिदानाचा सण’ (Feast of Sacrifice) हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. सूर्य पूर्णपणे उगवल्यानंतर मशिदीमध्ये विशेष बकरीद निमित्त नमाज अदा केली जाते. मशिदीमध्ये विशेष ईदची नमाज अदा करण्यासाठी पुरुष, महिला आणि मुले नवीन कपडे परिधान (Wearing clothes) करतात. स्त्रिया सणानिमित्त संपूर्ण शृंगार करतात. या सणानिमीत्त स्रीया हातावर मेहंदी काढणे महत्त्वपूर्ण मानतात. तुम्ही सुद्धा बकरी ईद निमित्त हटके मेहंदी डिझाईन शोधत असाल तर या काही स्टाईलिश डिझाईन्स नक्की ट्राय करा.

अरेबिक डिझाईन – अनेक महिलांना अरेबिक मेहंदी डिझाइन करायला आवडते. ही रचना स्रीयांची खूप आवडती आहे. त्यासाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागते. ही अगदी सहजपणे हातावर काढता येते. कामातून वेळ काढूनही तुम्ही ही मेहंदी घरी सहज लावू शकता. त्यासाठी या रचनेत मोठी फुले व पाने वापरली जातात. दिसायलाही सुंदर आणि आकर्षक दिसणारी अरेबिक मेंहदी या ईदला तुम्ही नक्की ट्राय करा.

मोटिफ्स मेहंदी डिझाईन – ईद निमित्त, महिला अनेकदा विशेष प्रकारे घर सजवण्यासाठी आणि स्वादिष्ट पदार्थांमध्ये व्यस्त असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मेहंदी लावायला आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या हातावर मेहंदीचे डिझाइन रेडीमेड मिळवू शकता. या मेहंदीने तुमचे हात भरलेले दिसतील. स्त्रियांना बहुतेकदा ही फुलांची मेहंदीची रचना आवडते. मून मेहंदी डिझाइन – तुम्ही ईदच्या निमित्ताने खास मून-स्टार मेहंदी देखील लावू शकता. आपण आपल्या हातांवर सुंदर चंद्र बनवू शकता. आपण हे डिझाइन अनेक प्रकारे लागू करू शकता. तुम्ही ते फुलांचा पॅटर्न आणि अरेबीक मेहंदी डिझाइनमध्ये देखील लावू शकता. हे डिझाइन तुमच्या हातावर खूप सुंदर दिसेल.

खफिफ मेहंदी डिझाईन – या निमित्ताने तुम्ही मेहंदीसोबत खफीफ डिझाईन देखील करू शकता. हे डिझाइन अत्यंत काळजीपूर्वक लागू करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला बारीक मेहंदी लावायची असेल तर तुम्ही हे डिझाइन करून घेऊ शकता. हे डिझाइन खूप सुंदर दिसते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.