स्नायूंच्या बळकटीसाठी ‘हे’ तीन तेल आहेत वरदान, वेदना झटक्यात होतात दूर

स्नायू किंवा Muscles बळकट करण्यासाठी आपण जिममध्ये जातो, जड व्यायाम करतो. पण, हे पुरेसं आहे का? कमकुवत स्नायूंवर जड व्यायामाचे ओझे टाकल्यास थकवा आणि इजा होण्याचा धोका वाढतो. मजबूत स्नायू आपल्याला केवळ फिटनेस उद्दीष्टे साध्य करण्यात मदत करू शकतात. दरम्यान, स्नायू बळकटीसाठी 3 तेल असे सांगणार आहोत, जे लावल्याने स्नायू बळकट होऊ शकतात.

स्नायूंच्या बळकटीसाठी 'हे' तीन तेल आहेत वरदान, वेदना झटक्यात होतात दूर
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 8:05 PM

खरं तर स्नायूंना सुडौल बनवण्यासाठी वर्कआऊटसोबतच नियमित मसाजही खूप गरजेचं आहे. स्नायूंना बळकटी देण्यासाठी फक्त जिममध्ये जाणं पुरेसं नाही हे तुम्हाला माहित आहे का? आत्तापर्यंत असाच विश्वास असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

साहजिकच स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला 3 प्रकारच्या तेलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नियमित वापराने वर्कआऊटचा योग्य फायदा होतो. जाणून घ्या.

बदामाचे तेल

वर्कआउटनंतर जर तुमचे स्नायूही दुखत असतील तर बदामाच्या तेलाने मालिश केल्यास तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. सौंदर्य वाढवण्यासाठी हे तेल बऱ्याच काळापासून वापरले जात आहे, पण स्नायूंना बळ देण्यासाठीही हे तेल फायदेशीर आहे हे तुम्हाला क्वचितच माहित असेल. हे तेल त्वचा खूप लवकर शोषून घेते आणि त्वचेची जळजळ किंवा पुरळ यासारख्या समस्या देखील दूर करते.

तिळाचे तेल

आयुर्वेदात शतकानुशतके तिळाच्या तेलाचा वापर केला जात आहे. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्हाला माहित आहे का तिळाचे तेल आपल्या स्नायूंना मजबूत बनवू शकते? खरं तर यात असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ कमी करतात आणि वेदना कमी करतात. रोज या तेलाने मालिश केल्याने स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो, शिवाय स्नायूंचा कडकपणा आणि कमकुवतपणाही दूर होतो.

नारळ तेल

नारळ तेल केवळ केस आणि त्वचेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील आहे. यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार तर होतेच, शिवाय तुमचे केस ही मजबूत आणि निरोगी राहतात. याशिवाय नारळ तेलात असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण करतात. दररोज नारळ तेलाने शरीराला मसाज केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात आणि तणावमुक्त वाटते.

साहजिकच स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला 3 प्रकारच्या तेलांबद्दल सांगितले आहे. नारळ तेल केवळ केस आणि त्वचेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आहे. बदान तेल स्नायूंना बळ देण्यासाठीही फायदेशीर आहे. हे तेल त्वचेत खूप लवकर शोषून घेते आणि त्वचेची जळजळ किंवा पुरळ यासारख्या समस्या देखील दूर करते. तर आयुर्वेदात शतकानुशतके तिळाच्या तेलाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे हे तिन्ही तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.