Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

हिवाळ्याच्या काळात आपल्या शरीराला उबदारपणा देतील, अशा गोष्टी खाणे आपल्याला आवडते. किंबहुना या काळात आपण अशाच पोषक आहाराला प्राधान्य देतो.

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:10 PM

मुंबई : हिवाळ्याच्या काळात आपल्या शरीराला उबदारपणा देतील, अशा गोष्टी खाणे आपल्याला आवडते. किंबहुना या काळात आपण अशाच पोषक आहाराला प्राधान्य देतो. यामुळे आपल्या शरीराला आतून उबदारपणा मिळू शकतो. हिवाळ्याच्या काळात आपल्याला शरीराला गरम ठेवणाऱ्या आणि प्रतिकारशक्ती बळकट करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. अशा या फळ आणि भाज्यांचे नियमितपणे  सेवन केल्यास आपल्याला हंगामी संक्रमण आणि सर्दीपासून संरक्षण मिळेल (Energy Booster Food for Winter).

हिवाळ्यामध्ये बरीच प्रकारचे फळे आणि भाज्या बाजारात विक्रीसाठी येतात. ज्यांच्या सेवनाने शरीर उबदार राहते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील मिळते. चला आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत.

शुद्ध तूप

हिवाळ्यामध्ये शुद्ध तूपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तूपात असंपृक्त चरबी असते, जी शरीराला उबदार व निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय शुद्ध तूपात अनेक औषधी गुण आहेत.

मध

शक्यतो आपण आपल्या सर्व आहारात साखरेऐवजी मधाचा वापर करावा. जर, तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल, तर तुम्ही त्यात साखरेऐवजी मध घालून खाऊ शकता. मध जितका चविष्ठ आहे, तितकाच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मधात अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट असतात (Energy Booster Food for Winter).

बदाम आणि खजूर

हिवाळ्यात बदाम आणि खजूर खाल्ल्याने शरीर उबदार राहते. या व्यतिरिक्त दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे गुणधर्म आहेत. बदाम आणि खजूर आपल्या आरोग्यासह, शरीराला त्वरित उर्जा देण्यास देखील मदत करतात.

गाजर

गाजरांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हिवाळ्यात सहज मिळणारी ही एक हंगामी भाजी आहे. याकाळात गाजर आपली प्रतिकारशक्ती वाढवते.

मुळा

मुळा ही भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही. पण मुळ्यात अनेक पोषक घटक असतात हे फारच कमी लोकांना माहिती आहे. मुळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे आपली पचन संस्था सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते (Energy Booster Food for Winter).

आले

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक आढळतात. हिवाळ्याच्या हंगामात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आल्याचा चहा पिणे आवडते.

मसाला

मसाले अन्नाची चव वाढविण्याचे काम करतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु, काही मसाले शरीराला उबदार ठेवण्यास आणि उर्जा देण्यास मदत करतात. हिवाळ्यात दालचिनी, मिरपूड, लवंगाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

(Energy Booster Food for Winter)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.