वैवाहिक जीवनातील छोटे छोटे ‘वादविवाद’ ही ठरू शकतात नात्यासाठी घातक.. जाणून घ्या, जोडीदाराशी नाते घट्ट करण्यासाठी आवश्यक गोष्टी!
वैवाहिक जिवनात अनेकवेळा जोडीदाराच्या काही गोष्टी समोरच्याला पटत नाहीत. त्यातून वादविवाद निर्माण होतात आणि दोघांमध्येही शीतयुद्ध चालू होते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये शीतयुद्ध चालू आहे का? जर होय, तर या रिलेशनशिप टिप्स फॉलो करून तुम्ही आपले नातेसंबध अधिक घट्ट करू शकता.
मुंबईः लग्न झाल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जाते हे खरे आहे, पण वैवाहिक जीवन (Marital life) संघर्ष आणि समस्यांनी वेढले गेले तर, ते नाते तुटण्याचा धोका अधिक असतो. लग्नानंतर, जेव्हा नाते नवीन असते, जेव्हा जोडीदार त्यांचे सर्व पैलू जोडीदारासमोर आणतात. तेव्हा अनेकवेळा मतभेद (Differences) होण्याची शक्यता अधिक असते. वैवाहिक जीवनात काळाच्या ओघात अशा अनेक गोष्टी समोर येतात किंवा अशा घटना घडू लागतात, ज्यामुळे काही जुन्या गोष्टी, किंवा सत्य माहिती समोर येते. अशी अनेक जोडपी आहेत जी आपल्या जोडीदाराच्या सवयी किंवा चुका मान्य करून नात्यात आनंदी राहतात, परंतु त्यांच्यात छोटी छोटी भांडणे सुरू होतात. जेव्हा या जोडप्यामध्ये अशा प्रकारचे शीतयुद्ध (Cold War) किंवा वादविवाद सुरू होतात तेव्हा परिस्थिती आणखी वाईट होऊ लागते.
शीतयुद्ध म्हणजे काय
शीतयुद्ध म्हणजे थेट लढण्याऐवजी एकमेकांशी वाद घालणे. यामध्ये एखादी व्यक्ती काहीही न बोलता अशी परिस्थिती निर्माण करते की समोरची व्यक्ती नाराज होते. जोडप्यांमध्ये एकमेकांमध्ये मूक वाद सुरू झाला तर ते अधिक धोकादायक आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये शीतयुद्ध चालू आहे का? जर होय, तर या रिलेशनशिप टिप्स फॉलो करून तुम्ही आपले नातेसंबध अधिक घट्ट करू शकता.
तुमचे मन शांत करा
तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नातेसंबंध पुर्वी सारखेच करण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमचे मन शांत केले पाहिजे. यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. मन शांत केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या चिडलेल्या जोडीदाराला ध्यानाचा सल्लाही देऊ शकता. असे केल्याने तुम्ही दोघेही नात्यातील दुरावा दूर करू शकता.
खरेदी आणि डीनर
असे म्हटले जाते की, बहुतेक महिला बाहेर खरेदी करून आणि डीनर करून आनंदी असतात, परंतु पुरुषांच्या बाबतीत असेच आहे. जर तुमची पत्नी किंवा तुमचा नवरा तुमच्यावर रागावत असेल आणि तुमच्या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असेल तर तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवण्याचे निमित्त शोधावे. यासाठी शॉपिंग किंवा डिनर हा उत्तम पर्याय आहे. क्वालिटी टाइममध्ये तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. असं म्हणतात की, तणाव किंवा राग शांत करण्यासाठी त्या गोष्टी कराव्यात, ज्या मनाला आनंद देतील आणि यासाठी खरेदी आणि रात्रीच्या जेवणाची पद्धत सर्वोत्तम ठरू शकते.
तुमच्या जोडीदाराला मिठी मारा
दैनंदिन जीवनात अशी खूप कमी जोडपी असतात जी विनाकारण आपल्या जोडीदाराला मिठी मारतात. या पद्धतीमुळे तुम्हाला सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते, परंतु सतत असे केल्याने तुमच्या जोडीदाराची चिडचिड दूर होऊ शकते. दिवसातून एकदा, आपल्या जोडीदाराला 30 सेकंद किंवा एक मिनिट मिठी मारा. कदाचित यामुळे त्याची नाराजी दूर होईल.