Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!
आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात.
मुंबई : आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात. जर आपल्या मुलासही मोबाईलचे असे व्यसन लागले असेल, तर त्याची ही सवय आतापासूनच मोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भविष्यात त्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, स्मार्टफोनच्या वापराचा परिणाम मुलांच्या मेंदूवर, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या विकासावर होतो. जर 10 वर्षांपर्यंतची मुले स्मार्टफोन सतत सात तास किंवा त्याहून अधिक काळ वापरत असतील, तर त्यांच्या मेंदूचा बाह्य थर, ज्याला कॉर्टेक्स म्हणतात, तो पातळ होऊ लागते. ज्याचा त्यांच्या मेंदूच्या वाढ होण्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे मेंदूत वाढ देखील थांबू शकते.
यामुळे मेंदूत ग्रे-मॅटरची घनताही कमी होऊ शकते. स्मरणशक्ती, लक्ष, जागरूकता, विचार, भाषा आणि चैतन्य यात ग्रे मॅटर या घटकाची महत्वाची भूमिका असते. याशिवाय स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांच्या डोळ्यात कोरडेपणा देखील येऊ शकतो. मुले जेव्हा मोबाईलवर एखादा गेम खेळतात, तेव्हा ते बराच वेळ त्यावर टिकून राहतात. असा प्रकरणात, बर्याच दिवसांपासून मुलांच्या डोळ्यांची व्यवस्थित हालचाल होत नाही. यामुळे डोळ्यात कोरडेपणा, लालसरपणा आणि डोळ्यातून सतत पाणी येणे, या समस्या उद्भवू शकतात (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).
‘या’ टिप्स मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करतील!
– मुलांना मोबाईलवर खेळण्यासाठी एक निश्चित वेळ द्या. या वेळेच्या नियमाबद्दल आपण कठोर असले पाहिजे.
– मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोला, त्यांना कथा सांगा. क्विझ आणि मेंदूला चालना देणारे असे बरेच गेम खेळा.
– मुलांना मैदानी खेळांमध्ये व्यस्त ठेवा. यामुळे मोबाईलकडे त्यांचे लक्ष कमी होईल.
– रात्री झोपत असताना मुलांना मोबाईल देऊ नका. झोपेच्या वेळी चांगल्या गोष्टी सांगा. झोपेच्या वेळी केल्या गेलेल्या क्रियाकलापांच्या खुणा आपल्या मेंदूत प्रकाशित राहतात. यामुळे, सकाळी उठल्याबरोबर प्रथम त्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोललात तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
– अन्न खाताना मोबाईल पाहण्याची सवय सोडून द्या. यामुळे मुलांच्या मनात खाण्याचा विचार येत नाही आणि बर्याच वेळा ते गरजेपेक्षा जास्त खातात, किंवा कधीकधी व्यवस्थित खात देखील नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
(Excess use of smartphone can stop growth of your childs brain)
हेही वाचा :
Food | सफरचंद सोलून खाताय? थांबा! आधी या सालीचे फायदे वाचा…#Apple | #Food | #health | #EatingHabitshttps://t.co/AC3ZR1gZja
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021