Weight Loss: ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे फायदा नव्हे होईल तुमचे नुकसान
ग्रीन टी चे सेवन करणे हे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्यापासून ते त्वचेला ॲलर्जी होण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकते.
नवी दिल्ली – आजकाल वजन घटवण्यासाठी लोक अनेक उपायांचा अवलंब करतात. महागड्या डाएट प्लानपासून ते व्यायामासाठी अनेक टिप्स फॉलो करण्यापर्यंत अनेक प्रयत्न केले जातात. त्यापैकीच आणखी एक उपाय म्हणजे ग्रीन टी (green tea) चे सेवन करणे , जो वजन कमी करण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा मार्ग बनला आहे. अनेक जण ग्रीन टीचे सेवन करताना दिसतात. मात्र याच ग्रीन टीचे अति प्रमाणात सेवन केल्यास फायद्याऐवजी नुकसानही (side effects) होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्यापासून ते त्वचेला ॲलर्जी (skin allergy) होण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी ग्रीन टी कारणीभूत ठरू शकतो.
एका अहवालानुसार, ग्रीन टीच्या सेवनामुळे वजन कमी होत नाही , पण त्यामुळे मेटाबॉलिज्म (metabolism) आणि एनर्जी सायकलचा नक्की फायदा होतो. चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी प्यायल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया.
शरीरात या गोष्टींची कमतरता निर्माण होते
ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे लोह सहजपणे शोषून घेते. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी लोह उपयुक्त असते, पण तुम्ही दिवसातून एक किंवा दोन कप पेक्षा जास्त ग्रीन टी प्यायलात तर तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो.
डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता
ग्रीन टी मध्येही कॅफेन असते आणि शरीरात त्याचे सेवन जास्त झाले तर डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी ग्रीन टी पासून लांबच रहावे. त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे.
लिव्हर डिसऑर्डर
तुम्हाला माहित आहे का, की जर ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुमचे लिव्हर म्हणजेत यकृतही निकामी होऊ शकते. इतकेच नव्हे तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ग्रीन टीचे कमी सेवन करावे. तसेच ॲंग्झायटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही ग्रीन टी पासून लांब रहावे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)