Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा थंड ठेवायची आहे? पण घरगुती उपाय माहित नाही? तर मग हा फेसपॅक वापरून पहाच
वाढत्या उष्णतेमुळे आणि घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं. त्यामुळे आपला चेहराही टवटवीत राहत नाही. अशा वेळी घरगुती फेस पॅक वापरल्यास त्याचा फायदा होतो.
Skin Care Tips:आता काही दिवसांवरच पावसाळा (Rainy season)आला आहे. तरिही आपल्यासाठी आम्ही ही टीप्स घेऊन आलो आहोत. याच कारण की अजूनही उन्हाळा संपलेला नाही. तर अनेक राज्यांमध्ये उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे उष्णता आणि घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं आहे. यादरम्यान त्वचेवर मुरुम आणि काळे डाग पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही निरोगी त्वचेसाठी अनेक प्रकारचे फेस पॅक वापरून पाहू शकता. जे नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात. हे नैसर्गिक घटक (natural ingredients) अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते त्वचेत खोलवर जाऊन पोषण करण्याचे काम करतात. घरी उपलब्ध घटकांचा वापर करून तुम्ही हे घरगुती फेस पॅक (homemade face packs) सहज बनवू शकता. हे फेस पॅक कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
-
मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक
एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती टाका. त्यात 2 चमचे गुलाबजल टाका. ते चांगले मिसळा. हा पॅक चेहरा आणि मानेला लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोरडे होऊ द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. हा पॅक चेहरा आणि मानेवरील घाण दूर करण्याचे काम करेल. त्वचेला थंड ठेवण्याचे काम करेल.
-
बेसन, हळद आणि काकडीच्या रसाने बनवलेला फेस पॅक
एका लहान भांड्यात एक चमचा बेसन हळद मिसळा. अर्धी काकडी किसून घ्या. या मिश्रणात त्याचे पाणी घाला. ते चांगले मिसळा. हा पॅक स्वच्छ चेहरा आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
-
तांदळाचे पीठ आणि दही फेस पॅक
एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात एक चमचा दही घाला. ते चांगले मिसळा आणि फेस पॅक बनवा. तो त्वचेवर लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचेला हलक्या हातांनी मसाज करून चेहरा धुवा. मात्र यानंतर फेस वॉश वापरू नका.
-
हळद आणि मधाचा फेस पॅक
एका भांड्यात दोन चमचे हळद घालून एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.
-
चंदन पावडर आणि दुधाचा फेस पॅक
एका भांड्यात 1 किंवा 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात 2 चमचे दूध घाला. त्याची पेस्ट बनवा. स्वच्छ त्वचेवर लावा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.