हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ तीन लाडू, आजच करा आहारात समावेश

हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचे लाडू बनवून खाल्ले जातात. ते बनवण्यासाठी तीळ, बदाम, मनुका आणि इतर अनेक पौष्टिक गोष्टींचा वापर केला जातो. थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य वाढविण्यासाठी ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात.

हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान ठरतील 'हे' तीन लाडू, आजच करा आहारात समावेश
Sesame Seeds LadooImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 1:21 AM

हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करण्याबरोबरच आहारात अनेक बदल करत असतो. अशा वेळी थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करत असतो. विशेषत: हिवाळ्यात आपल्या प्रत्येकाच्या घरी लाडू खाल्ले जातात, जे थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि ऊर्जा प्रदान करण्यास उपयुक्त ठरतात.

थंडीच्या दिवसात अळशी, मेथी, डिंक, सुंठ आणि तीळ यापासून लाडू बनवले जातात. ज्यामुळे लाडूचे पोषणमूल्य दुप्पट होते. अनेक प्रकारच्या समस्यादूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठीही लाडू उपयुक्त ठरतात जसे की लाडू बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो, तर त्यामध्ये लोहही आढळते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नुसार लाडूमध्ये घटकांचा समावेश करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही लाडूंबद्दल सांगणार आहोत जे हिवाळ्यात खूप खाल्ले जातात.

डिंकाचे लाडू

हिवाळ्यात आपल्या प्रत्येकाच्या घरी डिंकाचे लाडू बनवले जातात. कारण डिंकाचे लाडू हे थंडीच्या दिवसात शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. हे लाडू बनवण्यासाठी डिंक , देशी तूप, गूळ, बदाम, मनुका, बडीशेप, अळशी, पिस्ता आणि अक्रोड अशा गोष्टी मिसळल्या जातात. डिंकामध्ये कॅल्शियम आणि अनेक पोषक घटक असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. तसेच गूळ, देशी तूप, बडीशेप, बदाम आणि मनुका मध्ये असलेले पोषक घटक देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

तिळाचे लाडू

हिवाळ्यात तिळाचे लाडू आवर्जून बनवून त्याचे सेवन केले जाते. जे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. तिळात चांगले प्रथिने, कॅल्शियम आणि लोह असते जे हाडांसाठी फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन सी देखील आढळते. हे लाडू हाडे मजबूत करण्यासाठी, रक्ताची कमतरता भरून काढण्यास, त्वचा सुधारण्यासाठी आणि पचनसंस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

अळशी आणि डिंकाचे लाडू

हिवाळ्यात अळशी आणि डिंकाचे लाडू खाणेही अनेकांना खूप आवडते.अळशीमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच लाडू बनवण्यासाठी बडीशेप, मनुका, बदाम, गूळ, तूप आणि अनेक गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे लाडू बनवताना यामध्ये वापरले जाणारे हे पोषक घटक संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.