नववर्षात येवल्याच्या पैठणीत मोठा बदल, दोन्ही बाजूने नेसता येणारी पैठणी दोन रंगात

सातासमुद्रापार जगविख्यात असलेल्या येवल्याची पैठणी (Yeola Paithani saree) आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन ढंगात दाखल झाली आहे.

नववर्षात येवल्याच्या पैठणीत मोठा बदल, दोन्ही बाजूने नेसता येणारी पैठणी दोन रंगात
पैठणी साडी
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:34 PM

येवला (नाशिक) : सातासमुद्रापार जगविख्यात असलेल्या येवल्याची पैठणी (Yeola Paithani saree) आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन ढंगात दाखल झाली आहे. महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्राचे’ नवे रूप महिलांचे ‘सौंदर्य’ आणखीनच खुलावणार असून, नेहमीची एकाच बाजूने नेसता येणारी पैठणी (Yeola Paithani saree) आता दोन्ही बाजूने परिधान करता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रुपातील पैठणी दोन्ही बाजूने दोन रंगाची असणार आहे.

सर्वसाधारण पैठणी वा साडी ही एकाच बाजूने परिधान करता येते आणि तिचा रंगही एकच असतो.  मात्र दोन्ही बाजूने दोन रंगाची आणि दोन्ही बाजूने महिलांना परिधान करता येईल अशी आगळीवेगळी पैठणी येथील 75 वर्षीय राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त विणकर शांतीलाल भांडगे यांनी बनविली आहे. विशेष म्हणजे पैठणीच्या आजवरच्या वाटचालीतील ही एकमेव पैठणी साकारली आहे. ही पैठणी टू-इन-वन स्वरूपाची आहे.

महिलांचे सौंदर्य फुलवणारी येवल्याची पैठणी हे महाराष्ट्राचे ‘महावस्त्र’  म्हणून ओळखले जाते. गेल्या 400 वर्षापासून महिलांना येथील पैठणीने भुरळ घातली आहे. या पैठणीने अनेक रूपे धारण केली असून तिचे वर्षागणिक अनेक प्रकारची रूपं आणि रंगसंगती बाजारात विणकारांनी आणली. परंतु एकच पैठणी दोन्ही बाजूने परिधान करता येईल असा प्रयत्न यापूर्वी कधीही यशस्वी झाला नव्हता. तो नव्या वर्षात ग्राहकांना म्हणजे महिला वर्गाला प्रथमच पाहायला मिळणार आहे.

वास्तविक येथील पैठणीची वेगवेगळे रुपे भांडगे कुटुंबियांनी यापूर्वी साकारली आहेत. शांतीलाल भांडगे मुंबईत केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सेवा केंद्रात असताना त्यांनी 40 वर्षांपूर्वी अशी पैठणी बनविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस आलेले अपयश त्यांनी आज पूर्णत्वास नेले आहे.

दीड वर्षापूर्वी पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांनी आहे त्यापेक्षा आगळावेगळा हातमाग तयार केला आणि त्याच्यावर या पैठणीची निर्मिती सुरू केली. सुरुवातीची पाच सहा महिने चार पाच वेळेस त्यांना अपयश आले. छोट्या-छोट्या तुकड्यांवर त्यांनी पहिले काम करून अपयशातून यशाकडे जात सुधारणा करत, नंतर सलग 8 महिने मेहनत घेऊन ही पैठणी पूर्णत्वास नेली आहे.

नव्या पैठणीची वैशिष्ट्ये

इतर पैठणीपेक्षा दीड पटीने या पैठणीचे वजन, रेशीम, विणकाम कलाकुसर हे सर्वच घटक अधिक आहे. पैठणीचे साधारणत: वजन 700 ते 800 ग्रॅमच्या आसपास असते. मात्र ही पैठणी दीड किलो वजनाची असून पैठणीचा पदर आकुर्डी डिझाईनमध्ये बारव पंजा पद्धतीने बनवला असून, त्यावरील डिझाइनही पेशवेकाळातील आहे. 8 महिने मेहनत घेऊन भांडगे यांनी साकारलेली ही पैठणी पाहताक्षणीच नजरेस भरते. म्हणूनच पैठणीच्या इतिहासातील हा प्रयत्न कौतुकास्पद आणि पैठणीला नवा लूक देणाराच म्हणावा लागेल.

येवला शहरात आल्यानंतर अनेक प्रकारच्या नवनव्या पैठणीचे प्रकार पाहायला मिळतात, परंतु ही दुहेरी रंगाची पैठणी ही पैठणी जगतात एक नविन अविष्कार असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.