2023 मध्ये हे मेक अप चांगलेच राहिले चर्चेत आणि ट्रेडिंग जाणून घ्या
ग्लॅमर वर्ल्डमध्ये या मेकअपला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर या मेकअप्सचे ट्रेंड सुरू आहेत. तर हे मेकअप लुक्स कोणते आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : बहुतेक महिला या मेकअप शिवाय राहू शकत नाहीत. मग मेकअप शिवाय महिलांचं आयुष्य अपूर्णच असं म्हणायला हरकत नाही. त्यात आता लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. लग्न म्हटलं की मेकअप आलाच. तसंच मेकअपचा दरवर्षी नवनवीन ट्रेंड येताना दिसतो. तर आताही काही असे मेकअप आहेत ज्यांची संपूर्ण देशभरात चर्चा झाली.
पार्टी रेड लिप्स – रेड लिप्स बहुतेक महिलांना आवडतात. त्यात रेड लिपस्टिकला महिलांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तसंच आता हॉलिवूड अभिनेत्री टेलर स्विफ्टने रेड लिप्सला पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आणलं आहे. त्यामुळे आता मॉडेल्सपासून ते अभिनेत्रींपर्यंत प्रत्येकाने रेड लिपस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यामुळे सध्या रेड लिप्सचा लुक चांगलाच चर्चेत आहे.
पम्पकिन स्पाइस मेकअप – पम्पकिन स्पाइस मेकअप सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा मेकअप केल्यानंतर मोनोक्रोमॅटिक लुक तयार होतो. या मेकअपमध्ये तुमचे डोळे, गाल आणि ओठांना एकसारखे टोन देते. त्यामुळे हा मेकअप आपल्या चेहऱ्यावरती आणखीन उठून दिसतो. तसंच रिल्सवरती देखील बहुतेक महिलांनी हा मेकअप ट्राय केला आहे.
मेजर मेटॅलिक – यंदा मेजर मेटॅलिक या मेकअपचा ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. तसंच मेटॅलिक आय लूक मागील अनेक वर्षांपासून ट्रेंडमध्ये होता. तर मेजर मेटॅलिक हा मेकअप सुहाना खान पासून ते जानवी कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींनी ट्राय केला आहे. हा मेकअप आपल्या चेहऱ्यावर शाइन आणतो. तर हा मेकअप लूक करताना डोळ्यांवरती मेटॅलिक आयशॅडो आणि शिमरी आयशाडोचा वापर केला जातो