Video | ‘Femina Miss India 2020’चा मानाचा ताज बनवण्यासाठी लागते ‘इतकी’ मेहनत, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
मानाचा ताज शोभा श्रृंगार ज्वेलर्सने डिझाईन केला आहे. या मुकुटात बरेच हिरे जडवण्यात आले आहेत.
मुंबई : बुधवारी (10 फेब्रुवारी) मुंबईत ‘मिस इंडिया 2020’चा महाअंतिम सोहळा पार पडला. तेलंगणाच्या मानसा वाराणसीला यंदाचा ‘मिस इंडिया 2020’चा किताब मिळाला आहे. टॉप 3मध्ये यावर्षी मानसा वाराणसी अव्वल ठरली. तर, ‘मिस इंडिया 2020’चा मानाचा ताज तिला देण्यात आला. तर, फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली. मान्या सिंग फेमिना ‘मिस इंडिया 2020’ची उपविजेती ठरली (Femina Miss India 2020 crown made by shobha shringar jewelers).
यंदाचा अर्थात 2020चा मानाचा मुकुट मानसाच्या मस्तकावर सजला आहे. परंतु, हा मानाचा ताज बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, याबद्दल आपल्याला आम्हीत आहे का? या मुकुटात बरेच हिरे जडवण्यात आले आहेत. हा मानाचा मुकुट शोभा श्रृंगार ज्वेलर्सने डिझाईन केला आहे. मानाचा हा ताज बनवतानाचा व्हिडीओ फेमिना मिस इंडियाच्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केला गेला आहे.
असा बनला मनाचा मुकुट!
या व्हिडीओमध्ये ‘मिस इंडिया 2020’चा मुकुट कसा बनवायचा हे, प्रथम कागदावर डिझाईन केले गेले होते आणि नंतर त्याची रचना तयार केली गेली होती आणि त्यानंतर त्यात हिरे आणि इतर स्टोन लावण्यात आले होते, या खड्यांनी मुकुटाचे सौंदर्य आणखी वाढवले आहे.
View this post on Instagram
(Femina Miss India 2020 crown made by shobha shringar jewelers)
फेमिना मिस इंडियाचा मुकुट जिंकणारी मानसा वाराणसी ही हैदराबादची रहिवासी आहे आणि हा मुकुट जिंकण्यापूर्वी तीने ‘मिस तेलंगना’चा किताब देखील जिंकला होतं. ‘ग्लोबल इंडिया’तून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे आणि वसवी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मानसा फिक्स सर्टिफिकेशन इंजिनिअर म्हणून काम करते (Femina Miss India 2020 crown made by shobha shringar jewelers).
डिजिटली पार पडला ‘मिस इंडिया 2020’चा सोहळा
फेमिना मिस इंडियाचा महाअंतिम सोहळा मुंबईतील प्लश हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेथे अभिनेता पुलकित सम्राट, अभिनेत्री चित्रांगदा सिंह, वाणी कपूर, नेहा धुपिया आणि अभिनेता अपारशक्ती खुराना यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपारशक्ती यांनी केले, तर नेहा धुपिया या कार्यक्रमाची अधिकृत Pageant होती.
COVID-19 महामारीमुळे, मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आलं होतं. हे ‘मिस इंडिया 2020’चे 57वे वर्ष आणि आयोजन होते, जे काल पूर्ण झाले आहे.
(Femina Miss India 2020 crown made by shobha shringar jewelers)