Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Freak | ‘फिटनेस फ्रीक’ अनिल कपूर, वयाच्या 64व्या वर्षीही तरुणांसाठी ठरतायत प्रेरणादायी!

असे बरेच लोक आहेत जे अनिल कपूर यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करत आहेत.

Fitness Freak | ‘फिटनेस फ्रीक’ अनिल कपूर, वयाच्या 64व्या वर्षीही तरुणांसाठी ठरतायत प्रेरणादायी!
अनिल कपूर
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 11:43 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) 64 वर्षांचे आहेत, परंतु त्यांना कंटाळा हा शब्द किंवा कुठेतरी थांबून राहणे हे माहितच नाही. या वयातही अनिल कपूर अगदी फिट अँड फाईन आहेत. या वयातही तुम्ही नेहमी कार्सती करताना दिसतात. खूप वेगात धावणे, व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे, योग करणे या सर्व गोष्टींनी अनिल कपूर स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतात (Fitness Freak Anil kapoor doing exercise on beach).

तथापि, यासाठी ते नक्कीच बऱ्याच गोष्टी करत आहेत, परंतु आहाराच्या बाबतीतही ते बरेच सतर्क आहेत. असे, तर ते खूप फूडी आहेत, हे आम्ही नाही तर स्वतः अनिल कपूर सांगतात. नुकत्याच आपल्या एका पोस्टमध्ये त्यांनी आपल्या खाण्या-पिण्यावर वक्तव्य केले आहे.

वृद्धत्वाचा लवलेशही नाही!

पण, अनिल कपूरकडे पहिलं तर असं वाटतं की, म्हातारपण अद्याप त्यांच्या आसपासही फिरकलेलं नाही. निरोगी अन्न, निरोगी झोप आणि आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी अनिल कपूर यांच्या दैनंदिन कामात सामील आहेत. अलीकडेच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात तो शर्टलेस होऊन समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

ते किती तंदुरुस्त आहे, याचा अंदाज फक्त त्यांचे शरीर पाहूनच लावला जाऊ शकतो. त्यांचीही ही छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात सुरकुत्या नाहीत, तसेच त्याचे केसही पांढरे नाहीत. चेहऱ्यावरही असे आकर्षण आहे की, अगदी तरुण मुले देखील अवघडतील (Fitness Freak Anil kapoor doing exercise on beach).

व्यायामाला प्राधान्य!

यासह त्यांनी एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सामायिक केला आहे, ज्यामध्ये ते कदाचित प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून व्यायाम करत आहेत. सुरुवातीला हळू हळू चालणारे अनिल कपूर नंतर खूप वेगाने धावण्यास सुरुवात करतात. या वयात तुम्ही कोणालाही इतक्या वेगाने धावताना पाहिले नसेल. अनिल कपूर त्या तरुणांसाठी देखील एक प्रेरणा आहेत, जे फक्त व्यायाम न करण्याच्या सबबी शोधत असतात आणि त्यांच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

चाहत्यांना मिळतेय प्रेरणा…

तथापि, असे बरेच लोक आहेत जे अनिल कपूरपासून प्रेरणा घेत आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करत आहेत. त्यापैकी एका वापरकर्त्याने अनिल कपूर यांच्या पोस्टवर लिहिले की, ‘मी तुमच्या निम्म्या वयाचा आहे आणि माझे वजन तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. तुमच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. मी देखील व्यायाम सुरू केला आहे आणि मी आशा करतो की, तुमच्याप्रमाणेच मी तो पुढे चालू ठेवेन. धन्यवाद सर.’ त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, ‘तुम्हाला पाहून प्रत्येक वेळी हे सिद्ध होते की, वय फक्त एक संख्या असते.’

अनिल कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल जर बोलायचे, तर ते सध्या राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

(Fitness Freak Anil kapoor doing exercise on beach)

हेही वाचा :

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.