उन्हाळ्यात बनवा ‘हे’ 5 प्रकारचे रायते; शरीर आतून राहील थंड, हायड्रेटेड
उन्हाळ्याच्या दिवसात थंड पदार्थ खावेसे वाटते आणि या करिता प्रत्येक महिला या दिवसांमध्ये आहारात रायात्याचा समावेश करते. जर आपण रायत्याबद्दल बोललो तर ते केवळ चवीचा खजिनाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणारे आणि आतून थंड ठेवणारे पाच रायते जाणून घेऊया.

हवामान बदलाबरोबर आपल्या प्रत्येकाची जीवनशैली सुद्धा बदलते, त्याचप्रमाणे शरीराचे तापमान संतुलित राहावे आणि निरोगी राहावे यासाठी खाण्याच्या सवयींमध्येही बदल करत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात रायता हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे. दही किंवा ताकापासून बनवलेला रायता कॅल्शियम, प्रथिने आणि इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतो. त्यात असलेल्या घटकांमुळे रायत्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. रायत्यामध्ये दही आणि ताक वापरले जाते जे प्रोबायोटिक असतात आणि यांच्या सेवनाने उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवतात. बुंदी रायता साधारणपणे प्रत्येक घरात बनवला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात, तुम्ही काही गोष्टींचे रायता बनवू शकता जे केवळ शरीराला थंडावा देणार नाही तर ते हायड्रेटेड ठेवेल आणि ऊर्जा वाढवेल. त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचे रायते बनवू शकता. उन्हाळ्यात आपण कोणत्या गोष्टींपासून रायता बनवू शकतो ते जाणून घेऊया.
डाळिंबाचा रायता
उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही डाळिंबाचा रायता बनवू शकता. जर तुम्हाला दुपारी जेवणाची व काहीही खाण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही हा रायता बनवून खाऊ शकता जो खूप पौष्टिक आहे. यासाठी प्रथम दही चांगले फेटून घ्या जेणेकरून ते स्मुथ होईल. यानंतर, एक चमचा साखर घाला आणि ती विरघळेपर्यंत दही मिक्स करा. आता डाळिंबाचे दाणे घालून मिक्स करा. यानंतर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर थोडे भाजलेले जिरे घाला आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.
काकडीचा रायता
उन्हाळ्यात काकडीचा रायता उत्तम असतो. कारण काकडी आणि दही या दोन्ही गोष्टी थंडावा देणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये भरपूर पाणी देखील आहे. यासाठी काकडी किसून घ्या. ते दह्यात मिक्स करा. त्यानंतर यात भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी आणि थोडे काळे आणि थोडे पांढरे मीठ घाला. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एक छोटा चमचा तेल घेऊन कढीपत्ता, मोहरी इत्यादींचा तडका देखील या रायत्यात घालू शकता.




पुदिना रायता
उन्हाळ्यात तुम्ही पुदिन्याची चटणी अनेकदा खाल्ली असेल. याशिवाय तुम्ही पुदिन्याचा रायता देखील बनवू शकता. पुदिन्याची पाने घेऊन स्वच्छ धुवा आणि नंतर त्यांना दह्यात मिक्स करा. आता ते एका भांड्यात काढा. त्याची चव संतुलित करण्यासाठी, थोडी किसलेली काकडी घाला. चिरलेला कांदा घाला आणि काळे मीठ, काळी मिरी पावडर, जिरे पावडर घाला. पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि सर्व्ह करा.
फळांचा रायता
उन्हाळ्यात निरोगी आणि चविष्ट पर्यायाचा विचार केला तर तुम्ही फळांचा रायता बनवू शकता. यासाठी द्राक्षे, डाळिंब, केळी, सफरचंद यांसारखी फळांचे लहान तुकडे करा आणि नंतर यात ताजे दही मिक्स करा. तसेच यात तुम्ही काजू, बदाम, अक्रोड इत्यादी तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता. तसेच यात थोडी साखर, काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि भाजलेले जिरे पावडर घाला. आता ते थंड झाल्यावर खा.
दुधी भोपळा रायता
दुधी भोपळा रायता देखील उन्हाळ्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी, भोपळा धुतल्यानंतर, तो सोलून घ्या आणि किसून घ्या व पाच मिनिटे वाफेवर शिजूवा. दुधी भोपळा ठंड झाल्यानंतर दह्यात मिसळा आणि नंतर यात काळी मिरी पावडर, जिरे पावडर, काळे मीठ इत्यादी तेच मसाले मिक्स करा आणि थंडगार सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)