प्रेग्नन्सीनंतर Stretch Marks मुळे झालात त्रस्त ? कोरफडीसह हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
प्रसूतीनंतर बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सचा सामना करावा लागतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने हे मार्क्स कमी करता येऊ शकतात.
नवी दिल्ली – शरीरावरील स्ट्रेच मार्क्स (stretch marks) असणे अनेक लोकांना आवडत नाही. विशेषत: प्रसूतीनंतर (after pregnancy) बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सचा सामना करावा लागतो. ते कमी व्हावेत यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. स्ट्रेच मार्क्स होऊ नयेत किंवा कमी व्हावेत यासाठी गरोदरपणादरम्यान विशेष काळजी (care to be taken) घेणे गरजेचे असते. जर तुम्हालाही स्ट्रेच मार्क्सची समस्या सतावत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने हे मार्क्स कमी करता येऊ शकतात.
प्रसूतीनंतर असे कमी करा स्ट्रेच मार्क्स
हायलूरॉनिक ॲसिड – याचा वापर स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आणि हायड्रेटिंग इफेक्टमुळे स्ट्रेच मार्कसमुळे होणारी खाज कमी होते तसेच त्याचे व्रणही हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. असे मानले जाते की हे ॲसिड कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. यामुळेच अनेक ॲंटी- स्ट्रेच मार्क्स क्रीममध्ये हायलूरॉनिक ॲसिडचा वापर केला जातो.
कोरफडीचा करा वापर – कोरफड ही स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. त्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन Eच्या कॅप्सूल मिसळा व मिश्रण नीट एकत्र करा. आता हे तयार झालेले मिश्रण हलक्या हाताने स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागी लावावे. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ पुसून घ्यावी.
व्हिक्सचा करू शकता वापर – व्हिक्स व्हॅपोरब मध्ये काही इसेंशियल ऑईल्स असतात. यासोबतच यामध्ये पेट्रोलियम जेली देखील असते. हे सर्व त्वचेला मॉयश्चराइझ करते आणि मऊ बनवण्यास मदत करते. अनेक महिलांच्या अनुभवाच्या आधारे ते त्याचा वापर करतात, परंतु याबाबत अद्याप कोणतेही अचूक संशोधन समोर आलेले नाही.
कॅस्टर ऑईल – स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेलाचा मसाज देखील फायदेशीर मानला जातो. हे त्वचेला मॉयश्चराइज देखील करते. एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यास स्ट्रेच मार्क्स काही प्रमाणात कमी करता येतात. चांगला परिणाम हवा असेल तर एरंडेल तेल दिवसातून दोनदा वापरता येऊ शकते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)