Work routine : सकाळी घाईच्या वेळेत धावपळ होतेय! चिंता करू नका, ‘या’ टिप्स फॉलो करा

सकाळी उठून जेवण बनवणे, मुलांची शाळा, स्वत:ची ऑफीसची तयारी या सगळ्यात महिलांची खूप धावपळीत होते. हीच धावपळ टाळण्यासाठी काही गोष्टींचे आधीच नियोजन करून ठेवल्यास सकाळची कामे शांततेत उरकतील.

Work routine : सकाळी घाईच्या वेळेत धावपळ होतेय! चिंता करू नका, 'या' टिप्स फॉलो करा
कामांचे नियोजनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:55 AM

मुंबई :  सकाळी उठल्यापासून महिलांना बरीच कामं करावी लागतात. नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, त्यांची शाळेची तयारी, तसेच स्वत:ची ऑफीसची तयारी यामुळे सकाळी (Morning Work) त्यांची खूप धावपळ होते. त्यामुळे अनेक वेळा काही महत्वाच्या गोष्टी करणे विसरण्याची शक्यता असते. ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. मात्र हा सर्व गोंधळ टाळायचा असेल तर काही साध्या, सोप्या गोष्टी फॉलो करता येतील. रोजच्या कामांचे नियोजन (Work routine) करण्यासाठी काही उपाय केले तर सकाळी घाई होणार नाही. आणि सर्व कामे शांतपणे उरकता येतील. त्यामुळे तुमची एनर्जी तर वाचेलच (Save Energy) पण कामांच्या यादीमुळे येणार स्ट्रेसही कमी होऊ शकेल. तुमचा संपूर्ण दिवस शांतपणे जाईल आणि तुम्ही मनापासून, 100 टक्के एकाग्रतेने तुमचे काम करू शकाल.

असे करा कामाचे नियोजन

  1. सकाळी उठल्यावर तुमची कोणती कामे महत्वाची आणि वेळखाऊ आहेत याची यादी करा. रात्री झोपण्यापूर्वीच काही कामे करून ठेवल्यास सकाळचा बराचसा वेळ वाचतो. दुसऱ्या दिवशीचे घालायचे कपडे तयार करून ठेवणे, बॅग भरून ठेवणे इत्यादी कामे आदल्या रात्री केली तरी चालू शकतात. त्या कामांना फारसा वेळ लागत नसला तरी सकाळच्या वेळेत त्या कामांची वाचलेली 5 मिनिटेही खूप महत्वाची असतात.
  2. सकाळी नाश्ता काय करायचा, जेवण काय बनवायचे याचे नियोजन करणेही चांगले. आठवड्याभराच्या भाज्या, नाश्त्याचे पदार्श याची एक यादी करून फ्रीजवर लावून ठेवावी. रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी जे पदार्थ बनवायचे असतील, त्याची पूर्वतयारी करून ठेवल्यास सकाळी उठल्यावर फार धावपळ होत नाही. काही पदार्थ संपत आले असतील तर त्याची नोद करून ते मागवून ठेवता येतील, म्हणजे ऐन वेळेस गोंधळ होणार नाही. आपल्यासोबतच घरच्यांनाही या कामांमध्ये सामील करून घ्या. लहान मुलं असतील, तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता, त्यांना झेपतील अशी छोटी-मोठी कामे त्यांच्याकडून करून घेता येऊ शकतील. उदाहरणार्थ – कपड्यांच्या घड्या घालण्यास मदत करणे, दुसऱ्या दिवशीचे कपडे तयार करणे, स्वयंपाकघरातील छोटी मोठी कामे त्यांना सहज जमू शकतात.
  3. रात्री कामांची पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळी फक्त त्याची अंमलबजावणी करणे बाकी राहते. भाज्या चिरून ठेवणे, कणीक मळून ठेवणे. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी स्वच्छ पुसून ओट्यावर तयार ठेवणे, या तयारीमुळे सकाळची बरीचशी धावपळ वाचते.
  4. महत्वाच्या कामांची यादी करून ती फ्रीजवर चिकटवून ठेवू शकता. तसेच महत्वाच्या तारखा, उदा – बिल पेमेंट, रिचार्ज अशा गोष्टींची नोंद कॅलेंडरवरही करू शकता. कामे जसजशी पूर्ण होतील, तसे त्यासमोर टिकमार्क केले की काम सोपे होते आणि आपण काही विसरण्याची शक्यताही उरत नाही.
  5. हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.