मेकअप काढताना या गोष्टींची घ्या खास काळजी, स्किन खराब होण्यापासून वाचवा
मेकअपमुळे आपली त्वचा काही काळ चांगली दिसू शकते, परंतु जर मेकअप योग्य प्रकारे काढला नाही तर ते त्यामुळे त्वचेला आणखीनच हानी पोहोचू शकते.
नवी दिल्ली – चेहऱ्यावर मेकअप (apply makeup on skin) लावण्याचे आणि तो मेकअप काढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मेकअप केल्याने त्वचा काही काळ नक्कीच सुंदर दिसते, पण मेकअप करण्यापूर्वी किंवा नंतर जर तुम्ही त्वचेची काळजी (skin care) घेतली नाही तर ते धोकादायक ठरू शकते. ज्याप्रमाणे मेकअप लावण्यासाठी काही स्टेप्स असतात त्याचप्रमाणे ते काढण्यासाठीही काही स्टेप्सचे पालन करावे लागतात. त्या काटेकोरपणे फॉलो करून मेकअप रिमूव्ह (how to remove makeup) करावा अन्यथा तुमची त्वचा खराब होऊ शकते.
चुकीच्या पद्धतीने मेकअप काढल्याने होऊ शकतो त्रास
जर तुम्ही तुमचा मेकअप योग्य प्रकारे काढला तर तुम्ही तुमची त्वचा अनेक समस्यांपासून वाचवू शकता. अयोग्य पद्धतीने मेकअप काढल्यास कोलेजनच्या तुटण्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येणे, कोरडेपणा आणि सुरकुत्या येणे यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. रात्रभर डोळ्यांवर मेकअप ठेवल्याने डोळ्यांना संसर्ग होणे, पापण्यांचे केस तुटणे आणि डोळ्यांची जळजळ होणे, असा त्रास होऊ शकतो.
जेव्हा तुम्ही थकलेले असता, तेव्हा मेकअप काढणे कठीण वाटू शकते. मात्र, तुम्ही चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेऊन झोपलात तर तुमची त्वचा श्वास घेऊ शकत नाही, ज्यामुळे तेल आणि आर्द्रता शिल्लक राहते, परिणामी ब्रेकआउट, त्वचेची जळजळ आणि सूज येऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा येणे तसेच सुरकूत्या वाढू शकतात, आणि वेळेपूर्वी चेहऱ्याचे वय वाढलेले दिसू शकते.
आपली त्वचा नाजूक असते आणि गरम पाण्याने मेकअप काढल्याने त्वचा खराब होऊ शकते. मेकअप काढण्यासाठी थंड पाणी वापरणे देखील योग्य ठरत नाही, कारण त्यामुळे त्वचेतील तेल पूर्णपणे काढून टाकले जात नाही. म्हणूनच मेकअप पूर्णपणे काढून टाकण्यासाठी कोमट पाणी वापरावे.
मेकअप काढण्यासाठी या पद्धतीचा करा अवलंब
– कोणतेही बॅक्टेरिया किंवा जंतू टाळण्यासाठी आपले हात चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
– आपले केस बांधून ठेवा, ज्यामुळे तुम्ही चेहरा पूर्णपणे स्वच्छ करू शकाल. हेअरलाइनपर्यंत स्वच्छता केली पाहिजे.
– तुमच्या ओठांवरून मेकअप काढण्यासाठी, क्लीन्सर किंवा मायसेलर पाण्यात कॉटन पॅड भिजवा आणि तुमचे ओठ स्वच्छ करा.
– कॉटन पॅड ओठांवर काही सेकंद राहू द्यावे, नंतर त्याने ओठ स्वच्छ पुसावेत.
– हातावर क्लिंजिंग बाम घ्या आणि तुमच्या चेहऱ्याला खोलवर स्वच्छ करण्यासाठी मसाज करा.
– मायक्रोफायबर कापड किंवा कॉटन पॅडने, तुमचा चेहरा, कान आणि मान हलक्या हाताने पुसून घ्या.
– उर्वरित मेकअप, घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी सौम्य फेसवॉशचा वापर करा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.