हेअर कलरमुळे केस झालेत निर्जीव ? या टिप्स फॉलो केल्यात तर डॅमेज होणार नाहीत केस

केसांना हेअर डाय लावरल्यानंतर केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा केस निर्जीव आणि कोरडे होतात.

हेअर कलरमुळे केस झालेत निर्जीव ? या टिप्स फॉलो केल्यात तर डॅमेज होणार नाहीत केस
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 3:28 PM

नवी दिल्ली : हेअर डाय (hair dye) किंवा हेअर कलर (hair color) वापरणे हे आजकाल खूप कॉमन आहे. पण त्याचा वापर केल्यानंतर केसांची योग्य काळजी कशी घ्यावी हे फार कमी लोकांना माहिती असते. योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे (dry hair) होऊ लागतात आणि त्यांची चमकही नाहीशी होते व ते निर्जीव दिसू लागतात. जर तुम्ही केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा नियमित वापर करत असाल तर त्यामध्ये असलेले केमिकल (chemicals) तुमच्या केसांना सहजपणे खराब करू शकतात आणि ते कमकुवत होऊ शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी काय करावे, केसांची योग्य काळजी कशी घ्यावी, ते जाणून घेऊया.

वारंवार केस धुणे टाळावे – जर तुम्ही हेअर कलर केला असाल तर केस दररोज धुवू नका, आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच शांपूचा वापर करा. आवश्यक असल्यास, ड्राय शांपू वापरा. असे केल्याने केमिकलयुक्त हेअर कलरचा पुन्हापुन्हा वापर करावा लागणार नाही.

कंडिशनरचा वापर – तुम्ही शांपूने केस धुतले नाहीत तरी केसांना कंडिशनर लावा. असे केल्याने केस मऊ राहतील आणि ते सहजपणे तुटणे टळेल. अशाप्रकारे, तुमच्या केसांचा रंग देखील बराच काळ टिकेल.

हे सुद्धा वाचा

योग्य शांपूचा वापर – शांपू निवडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्ही फक्त तोच शांपू वापरा ज्यात हानिकारक रसायने नसतील. उदाहरणार्थ, तुम्ही सल्फेट-मुक्त शांपू वापरू शकता कारण ते केसांना हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याशिवायशांपूमधील सॅलिसिलिक ॲसिड आणि केटोकोनाझोलसारखी मजबूत रसायने यामुळे केस कोरडे होतात.

नीट केस धुवा – केसांना हेअर डाय लावल्यानंतर अनेकांच्या डोक्यात खाज येण्याची तक्रार असते. हेअर डाय केसांना नीट सूट न झाल्यामुळे किंवा केस व्यवस्थित न धुल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे डाय केल्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत.

हीट प्रोटेक्‍शनचा वापर – हेअर स्टाइल करण्यापूर्वी जर तुम्ही हीट प्रोटेक्‍शनचा वापर करत असाल तर तुमचे केस खराब होण्यापासून वाचतात आणि केस कोरडे होत नाहीत. म्हणूनच तुम्ही हीट प्रोटेक्‍शनचा वापर करणे आवश्यक आहे.

हेअर मास्क आवश्यक – रंगलेल्या केसांना अतिरिक्त पोषण आवश्यक असते. म्हणूनच हेअर मास्क वापरणे आवश्यक आहे. हे केसांना आतून पोषण देते ज्यामुळे केस मजबूत होतात. यासाठी केसांमध्ये केळी, शिया बटर, खोबरेल तेल, दही इत्यादी वापरू शकता.

एअर ड्राय आवश्यक – केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरने केस कोरडे केले तर केस खराब होतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही त्यांना स्वतःच सुकवू द्या. यामुळे केसांची आर्द्रता उडून जाणार नाही आणि केस मऊ राहतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.