Hair Care After Bathing In Winter: केस तुटण्यापासून वाचायचे असेल तर अंघोळीनंतर घ्या अशी काळजी

हिवाळ्यात केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर अनेक समस्या आपोआप दूर होतात. काही टिप्सचा उपयोग करून तुम्ही थंडीच्या दिवसातही केसांची उत्तम निगा राखू शकाल.

Hair Care After Bathing In Winter: केस तुटण्यापासून वाचायचे असेल तर अंघोळीनंतर घ्या अशी काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 2:38 PM

नवी दिल्ली – हिवाळ्यात अंघोलीनंतर आपण शरीरासाठी लोशन किंवा मॉयश्चरायझरचा वापर करतो, पण केसांची अतिरिक्त काळजी (hair care) घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत नाही. एवढंच नव्हे तर अनेक लोक केस धुतल्यानंतर ओले केस (wet hair) कंगव्याने विंचरतात, ज्यामुळे केस लवकर गळू व तुटू लागतात. तर काही लोक थंडीच्या दिवसांत केसांसाठी हेअर ड्रायरचा (hair dryer) सर्रास वापर करतानादिसतात, मात्र त्यामुळे केस अधिक कोरडे होतात. तसेच आतून कमकुवत आणि फ्रिझी होतात. हिवाळ्याच्या दिवसांत केस हेल्दी ठेवण्यासाठी अंघोळीनंतर कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया.

केस धुतल्यानंतर वापराव्यात या गोष्टी

केसांना लावा कंडीशनर

हे सुद्धा वाचा

केस शांपूने धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावावे. असे केल्याने केसांमधील कोरडेपणा आणि फ्रिझीनेस कमी होईल. यामुळे केसांचे नुकसानही कमी होईल. कंडीशनर हे केसांमधील ओलावा लॉक करण्याचे काम करते.

हेअर सीरम गरजेचे

केस धुतल्यानंतर केसांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी चांगले हेअर सीरम वापरा. केस धुतल्यानंतर जेव्हा केस कोरडे होतील तेव्हा केसांना सीरम लावावे. मात्र हे हळूवार हाताने केसांना लावावे , जोरात घासू अथवा चोळू नये.

सैल बँड वापरावा

केस ओले असताना कधीही बांधू नयेत, असे केल्याने केस लवकर तुटतात. तसेच केस बांधताना नेहमी सैलसर, स्ट्रेचेबल हेअर बँडचा वापर करावा. तुम्ही यासाठी स्कार्फ किंवा क्लॉथ कव्हर असलेल्या इलॅस्टिक बँडचा वापर करू शकता.

जाड कंगव्याचा वापर करावा

केस विंचरण्यासाठी किंवा त्यातील गुंता सोडवण्यासाठी बारीक दाताच्या कंगव्याऐवजी जाड दात असणारा कंगवा वापरावा. तसेच कंगव्याने केस विंचरण्याआधी हाताच्या बोटांनी हळूवारपणे जटा सोडवून घ्याव्यात. यामुळे केस तुटण्याची समस्या कमी होते.

हीटिंग टूल्स वापरू नका

ओले केस वाळवण्यासाठी किंवा त्यांची स्टाईल करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर करू नये. यामुळे केस लवकर कमकुवत होतात आणि वेगाने गळू लागतात अथवा तुटू शकतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.