Healthy Aging : नेहमी तरुण दिसायचं आहे?, मग आहारात ‘या’ 9 पदार्थांचा समावेश नक्की करा
काही असे अँटी एजंट फुड्स असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.
मुंबई : प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याने निरोगी आयुष्य जगावं. पण, तसं होत नाही (Food For Healthy Aging ). जसं जसं वय वाढत जातं, तसे आजारंही वाढत जातात. पण, काही असे अँटी एजंट फुड्स असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता (Food For Healthy Aging ).
ब्रोकोली – वाढत वय रोखण्यासाठी ब्रोकोली एका औषधाप्रमाणे काम करतं. ब्रोकोली मध्ये निकोटिनमाईड मोआनोन्युक्लियोटाईड असतात जे स्नायू, लिव्हर आणि डोळ्यांसाठी चांगलं मानलं जातं. याने वजनही नियंत्रणात राहते. तसेच, रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
शिमला मिर्ची – शिमला मिर्ची अँडी एजिंग फुड्स आहे. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटामिन सीने युक्त असते. यामुळे निरोगी आयुष्य जगता येतं. यामुळे मोतियाबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन सारखे आजार रोखण्यास मदत होते.
गाजर – गाजरमुळे दीर्घ आयुष्य मिळते तसेच हे तुम्हाला आकर्षकही बनवते. ग्लासगो आणि एक्सेटकच्या विश्वविद्यालयाद्वारे झालेल्या एका अभ्यासानुसार, गाजरमधील कॅरोटिनॉयड वाढत्या वयाला रोखण्यास मदत करतात. गाजरमधील व्हिटॅमिन ए त्वचेला निरोगी आणि सतेज बनवतात.
अक्रोट – बीएमसी मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक आठवड्यात तीनवेळा किंवा यापेक्षा जास्त वेळी अक्रोट खातात त्यांचं वय दोन ते तीन वर्षांपर्यंत वाढतं.
सारडाईन फिश – ओमेगा-3 फॅटी अॅसिड वाढत्या वयाला रोखण्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. अकादमी ऑफ न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सनुसार यामुळे हृदय आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. यामध्ये असलेल्या ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन B12 मुळे दीर्घ आयुष्य लाभते.
अॅवोकाडो – अॅवोकाडो हा फळ खाण्यास अत्यंत चविष्ट असतं, त्यासोबतच हे अत्यंत पौष्टिकही असतं. यामुळे त्वचा सतेज होते. यामधील व्हिटॅमिन ए शरीराला इन्फेक्शनपासून दूर ठेवते.
ब्लुबेरीज – ब्लुबेरीज व्हिटॅमिन ए आणि सी सोबतच एंथोसायनीन सारखे अँटी-एजिंग अँटीऑक्सिडेंट असतात. स्टडीनुसार, यामुळे शरीर निरोगी राहतं आणि वय वाढण्यापासूनही रोखतं.
सब्जा – सब्जा हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतं. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात जे त्वचेची रक्षा करतात. चिया सीड्समध्ये ओमेगा -3 , फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो अॅसिड असतात (Food For Healthy Aging).
द्राक्ष – द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी एजिंग तत्व असतात. एका द्राक्षात 1600 नैसर्गिक प्लांट कंपाऊंड असतात. त्याशिवाय, यामध्ये अँटीऑक्सिडेंटआणि अन्य पॉलीफेनॉल्सही असतात. यामुळे वाढत वयाची गती कमी होते.
Papaya Leaf | आरोग्यवर्धक पपईच्या पानांचा रसही गुणकारी, वाचा याचे फायदे…#PapayaLeaf | #Papaya | #Health | #HealthBenefits | #food https://t.co/N9BbVuttzk
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
Food For Healthy Aging
संबंधित बातम्या :
Golgappa Benefits | चटपटीत पाणीपुरीचे असेही अनेक फायदे, वाचून व्हाल हैराण…
Pickle Effect | चटकदार लोणचे खाण्याची सवय पडू शकते महाग, जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान…
Winter Care | हिवाळ्यात ‘ही’ पेय ठेवतील शरीराला आतून उबदार, वाचा यांची वैशिष्ट्ये…
Broccoli Benefits | हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे प्रचंड फायदे, अनेक आजारांत ठरेल लाभदायी!