Food Hacks | जेवणात जास्त मीठ पडलंय? चिंता सोडा नि ‘या’ टिप्स वापरा!

| Updated on: Feb 02, 2021 | 5:38 PM

एखाद्या पदार्थात मीठ कमी पडले तर, त्याचे प्रमाण वाढवता येते. परंतु, जास्त प्रमाणात मीठ पसल्यास काय करावे, हे समजत नाही.

Food Hacks | जेवणात जास्त मीठ पडलंय? चिंता सोडा नि ‘या’ टिप्स वापरा!
शरीर निरोगी ठेवण्यात मीठ महत्त्वाची भूमिका बजावते.
Follow us on

मुंबई : आपल्या अन्नाला चवदार बनवण्यात मीठ महत्त्वाची भूमिका निभावते. बर्‍याच वेळा खूप चांगला स्वयंपाक बनलेला असताना, केवळ त्यात मीठ जास्त पडले की आपल्या तोंडाची चव पूर्ण खराब होते. बर्‍याच लोकांना जेवणात जास्त मीठ खायला आवडते. मात्र, दररोज जास्त प्रमाणात मीठ सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे (Food Hacks tips to reduce excess salt from food).

बर्‍याच वेळा, आपण अन्न शिजवता तेव्हा कमीतकमी मीठ घालण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या पदार्थात मीठ कमी पडले तर, त्याचे प्रमाण वाढवता येते. परंतु, जास्त प्रमाणात मीठ पसल्यास काय करावे, हे समजत नाही. अशा परिस्थितीत अन्न फेकून दिले जाते किंवा जास्त प्रमाणात मीठ दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थाची चव निघून जाते. जर तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल आणि अन्नाची नासाडी झाली असेल, तर पुढच्यावेळेस या टिप्स नक्की लक्षात ठेवा. चला तर, जेवणात पडलेले अतिरिक्त मीठ कमी असे करावे याच्या सोप्या टिप्स जाणून घेऊया…

भाजलेले बेसन पीठ

जर रस्सेदार भाजीत जास्त मीठ जास्त पडले असेल, तर त्यात भाजलेले बेसन पीठ घालून चांगले मिक्स करावे. याशिवाय करी किंवा तळणीच्या भाजीमध्येही हा उपाय वापरु शकता. भाजलेले बेसन पीठ टाकल्याने भाजी, आमटीची चवही वाढते  आणि मीठही कमी होते.

कणीकेचा गोळा

भाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. उकळी आल्यानंतर ती लाटी भाजीमधून काढून घ्यावी. कणकेचे पीठ जेवणातील मीठ शोषून घेते (Food Hacks tips to reduce excess salt from food).

लिंबाचा रस

जर आपण इटालियन, चायनीज आणि मुघलई पदार्थ बनवत असाल आणि त्यात मीठ जास्त पडले असेल, तर आपण त्यात लिंबाचा रस घालू शकता. अन्नात आंबटपणामुळे मीठ कमी होते आणि चवही वाढते.

बटाटे

भाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा. बटाटा किसून टाकल्यास भाजीला घट्टपणा देखील येईल.

ब्रेड वापरा

जर आपल्याकडे भाजी किंवा आमटीतील मीठ कमी करायला पुरेसा वेळ नसेल तर, सरळ त्यात एखादा ब्रेडचा तुकडा टाका. एक ते दोन मिनिटानंतर हा ब्रेड बाहेर काढा. हा ब्रेड आपल्या भाजीतील मीठाचे प्रमाण कमी करेल. मात्र, ब्रेडमुळे भाजीतील पाणी कमी झाले असेल, तर त्यात थोडे कोमट पाणी घाला.

शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स

ज्यावेळी एखाद्या भाजीमध्ये मीठ, मसाला दोघांचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी आपण शेंगदाण्याचे कुट किंवा ड्रायफ्रुट्सची पोस्ट वापरुन जेवण चवीष्ट करु शकता. तसेच खारट मसालेदार भाजीत नट बटर मिक्स करुन भाजी रुचकर करु शकता. परंतु ज्या भाज्यांमध्ये नट पेस्ट टाकून चांगली लागेल अशाच भाजांमध्ये वापरा.

(Food Hacks tips to reduce excess salt from food)

हेही वाचा :