Weight Loss | वजन कमी करताय? या 5 गोष्टी आहारात नक्की समाविष्ट करा!

वजन कमी करण्यासाठी आपण आहारात या ‘5’ खाद्य पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यात ते तुमची मदत करू शकतात.

Weight Loss | वजन कमी करताय? या 5 गोष्टी आहारात नक्की समाविष्ट करा!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:27 PM

मुंबई : वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा हेवी वर्कआउट्स आणि डाएटिंग सल्ला दिला जातो. परंतु, यामुळे आपल्याला स्लिम-ट्रिम बॉडी मिळेलच, असे नाही. तसेच या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतात. अन्नातून आपल्या शरीराला पोषण मिळते, जे आपल्या शरीरास तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करतात (Food ingredients For weight loss).

वजन कमी करणे म्हणजे शरीरातील कॅलरी कमी करणे आणि खाद्यपदार्थांसह इतर गोष्टींमध्ये संतुलन राखणे. वजन कमी करण्यासाठी आपण आहारात या ‘5’ खाद्य पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यात ते तुमची मदत करू शकतात.

  1. पाणी

वजन कमी करण्यासाठी पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. पाणी आपल्याला केवळ हायड्रेटेडच ठेवतच नाही, तर आपले पोटदेखील भरते. यामुळे बराच काल भूक लागत नाही. शिवाय त्यात कॅलरीही नसतात. याने आपल्या शरीराचा द्राविक समतोल राखला जातो.

  1. हिरव्या भाज्या

भोपळा, काकडी, स्क्वॅश सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. व्हिटामिन-एने समृद्ध हिरव्या भाज्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारतात आणि पाचक शक्ती वाढविण्यात मदत करतात. त्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्तच राहते, परंतु वजन कमी करण्यास देखील मदत करते (Food ingredients For weight loss).

  1. लिंबूवर्गीय फळे (सिट्रस)

लिंबूवर्गीय फळांमध्ये कमी प्रमाणात कॅलरी आढळतात. त्यामुळे वजन कमी कमी होण्यास मदत होते. सिट्रसमध्ये व्हिटामिन-सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्या पाचन तंत्राची देखील काळजी घेतली जाते. यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही.

  1. ग्रीन टी

अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध, ग्रीन टी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि शरीराचे विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. ग्रीन टीमध्ये आढळणारे हे अँटीऑक्सिडेंट्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.

  1. आले आणि लसूण

आले आणि लसूण कमी कॅलरीयुक्त पदार्थ आहेत जे प्रत्येक स्वयंपाकघरात सहजपणे आढळतात. हे पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात देखील मदत करतात. याशिवाय जळजळ आणि मधुमेह यासारख्या जुनाट आजारांवरही उपचार करण्यात मदत करतात.

(Food ingredients For weight loss)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.