हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल, तर ‘हे’ खाणं टाळा!
हिवाळ्यात जे पदार्थ आपण मोठ्या चवीने खातो त्यामुळेच आपलं आरोग्य बिघडतं. त्यामुळे हिवाळ्यात काही गोष्टी खाणं कटाक्षाने टाळायला हवं.
मुंबई : हिवाळ्यात व्यक्तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात उत्तम असते, असं म्हटलं जातं. मात्र, तरीही या ऋतूत आरोग्य चांगलं होण्याएवजी बिघडतं. याचं कारण म्हणजे आपलं खाणं-पिणं. हिवाळ्यात जे पदार्थ आपण मोठ्या चवीने खातो त्यामुळेच आपलं आरोग्य बिघडतं. त्यामुळे हिवाळ्यात काही गोष्टी खाणं कटाक्षाने टाळायला हवं.
टोमॅटो :
हिवाळ्यात लोक सलाड आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा वापर करतात. या ऋतूत मिळणारे टोमॅटो हे दिसायला तर लाल असतात. मात्र, त्यांची चव ही उन्हाळ्यात मिळणाऱ्या टोमॅटोपेक्षा वेगळी असते. हिवाळ्यात येणारे टोमॅटो हे शरिरासाठी नुकसानकारक असतात.
लाल मिर्ची पावडर :
हिवाळ्यात लाल मिर्ची पावडर खाणेही तुमच्या शरिरासाठी नुकसानकारक ठरु शकते. अशा मोसमात लाल मिर्ची पावडर हे पोटासाठी योग्य नाही. याएवजी तुम्ही काळी मिरी वापरु शकता.
स्ट्रॉबेरी :
हिवाळ्यात बाजारात मिळणारी स्ट्रॉबेरीही शरिरासाठी नुकसानकारक ठरु शकते. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचा रंग फिक्का पडतो. स्ट्रॉबेरीच्या रंगाचा फायटोन्युट्रिशनसोबत सरळ संबंध असतो. अशा प्रकारचे पदार्थ हे हिवाळ्यात नाही तर उन्हाळ्यात खावे.
चॉकलेट कुकीज :
चॉकलेट कुकीज कुणाला नाही आवडत? हे अत्यंत चविष्ट असतात. मात्र, यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असल्याने हिवाळ्यात हे खाणं टाळावं.
गरम कॉफी :
हिवाळ्यात पाणी कमी पिल्याने शरीर डी-हायड्रेट झालेलं असतं. अशात जर तुम्ही गरम कॉफीचं सेवन केलं तर त्यामधील अतिप्रमाणातील कॅफिनमुळे वारंवार लघवी येते. त्यामुळे शरिरातील पाणी आणखी कमी होतं. याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसू लागतो.
रेड मीट :
रेड मीट आणि अंडी यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. मात्र, हिवाळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीनचं सेवन करणे शरिरासाठी चांगलं नाही. हिवाळ्यात रेट मीटएवजी तुम्ही मासे घेऊ शकता. माशांमध्येही प्रोटीन असतं, मात्र ते रेट मीटच्या तुलनेत कमी असतं आणि त्यामुळे आरोग्याला धोका नसतो.
ऑफ सीजन फळ :
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बेमोसमी फळ खाणे टाळावे. कारण ही फळं ताजी नसतात. त्यामुळे ती तुमच्या शरिरासाठी नुकसानकारक ठरु शकतात.
मद्यपान :
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोक पाणी कमी पितात. त्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. हिवाळ्यात लोक शरिराला उब मिळावी म्हणून मद्यप्राशन करतात. मात्र, याचा उलटा परिणाम तुमच्या शरिरावर होतो. हिवाळ्यात मद्यप्राशन केल्याने शरीर आणखी डी-हायड्रेट होतं, त्यामुळे या दिवसांमध्ये मद्य प्राशन करणे टाळावे.
Foods to avoid in winter