नवी दिल्ली : दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे (Chocolate Day) देखील साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये (Valentine week) प्रत्येकजण एकमेकांना चॉकलेट देत असताना आपली त्वचा त्यापासून दूर का ठेवायची? खरंतर, चॉकलेटमध्ये असलेले काही घटक त्वचेची चमक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्वचेवर चमक तर येईलच पण सुरकुत्याही कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी हा चॉकलेट फेस मास्क (Chocolate face mask) जरूर वापरून बघा.
ॲक्ने, पिंपल्स आणि पिगमेंटेशनसारख्या समस्यांमुळेकोणाचीही त्वचा खराब होऊ शकते. अशावेळी चमकणारी त्वचा तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते. चमकदार त्वचेसाठी चॉकलेट कसे फायदेशीर ठरू शकते ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून रोखते चॉकलेट
तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सर्व चॉकलेट्सपेक्षा डार्क चॉकलेटचे सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे, त्वचेसाठी चॉकलेट वापरण्याचा विचार केला तरी डार्क चॉकलेट सर्वात प्रभावीपणे कार्य करते. तसेच केवळ चॉकलेटच नाही तर अँटी-ऑक्सिडेंटने समृद्ध असलेली कोको पावडर देखील त्वचेसाठी चमत्कार करू शकते.
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून रोखतात आणि कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सुरकुत्या मुक्त दिसते. तसेच डार्क चॉकलेटमध्ये असलेले झिंक स्वच्छ आणि स्मूथ त्वचेसाठी खूप प्रभावी मानले जाते.
डार्क चॉकलेटमध्ये एक प्रकारचे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड असते जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर यामध्ये असलेले फ्लेव्होनॉल्स हे सूर्याच्या हानिकारक किरणांच्या प्रभावापासून त्वचेचे संरक्षण करतात. तसेच ते त्वचेचा रक्तप्रवाह देखील वाढवतात, ज्यामुळे त्वचा डागरहित आणि चमकदार दिसते. डार्क चॉकलेट हे त्वचेच्या हायड्रेशनसाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
तुम्ही घरच्या घरी चॉकलेट फेस मास्क सहज बनवू शकता. तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही तो कस्टमाईजही करू शकता.
1) डार्क चॉकलेट आणि मधाचा फेस मास्क
कृती – प्रथम एका भांड्यात डार्क चॉकलेट वितळवून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध घाला. हे मिश्रण त्वचेला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. नंतर चॉकलेट व मधाचे हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील मास्क कोरडा होईपर्यंत ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि हलक्या हाताने टॉवेलने टिपून घ्या, मग जेव्हा हा मुखवटा कोरडा होऊ लागतो तेव्हा सामान्य पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
2) चॉकलेट आणि फळांचा मास्क
कृती – ब्लेंडरमध्ये कोको पावडर किंवा वितळलेले डार्क चॉकलेट घ्या. त्यामध्ये स्ट्रॉबेरी, केळी आणि संत्र्याचे काही तुकडे टाका आणि हे सर्व एकत्र फिरवून बारीक करून घ्या. हा मास्क त्वचेवर लावा आणि त्वचेला हलक्या हातांनी 5 मिनिटे मसाज करा. नंतर त्वचेवर हा मास्क किमान 20 मिनिटे राहू द्या. वाळायला लागल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी, हा मास्क आठवड्यातून दोनदा वापरा.
3) कोको ब्यूटी ट्रीटमेंट फेस मास्क
व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून त्यातील द्रव एका बाऊलमध्ये काढा. त्यामध्ये कोको पावडर, मध आणि दही घालून हे सर्व एकत्र मिसळा. ही पेस्ट त्वचेवर आणि मानेवर नीट लावा. ती वाळू द्या आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. आठवड्यातून दोन वेळा त्याचा वापर करा.