Corona virus : कोरोनाची चार नवी लक्षणे, ज्याबाबत मधुमेही रुग्णांना माहित असणे गरजेचे
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी इन्सुलिनला इंजेक्ट करण्याची आवश्यकता असते. ती रुग्णाची इम्युनिटी दाबून ठेवते. मधुमेहाच्या रुग्णाला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका राहण्यामागील हेच एक प्रमुख कारण आहे. (Four new symptoms of corona that diabetics need to be aware of)
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अजूनही चिंताजनकच आहे. नवीन रुग्णसंख्या आणि मृत्यूदर चिंता करण्यासारख्याच पातळीवर आहे. त्यात तरुण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना म्युटेंट वायरस स्ट्रेनची लागण होत आहे. मधुमेहाचे रुग्ण कोरोना संसर्गाच्या आणि मृत्यूदराच्या बाबतीत हायरिस्क गटात मोडत आहेत. कारण कोरोना विषाणू वेळोवेळी रुपे आणि लक्षणे बदलत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत विषाणूचा थांगपत्ता लावणे कठीण बनत आहे. (Four new symptoms of corona that diabetics need to be aware of)
मधुमेहाच्या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका का?
मधुमेह हा एक गंभीर आणि जिवघेणा आजार आहे. हा आजार आपल्या शरिरातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यानंतर संभावतो. ब्लड शुगरला ब्लड ग्लुकोजही म्हटले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी इन्सुलिनला इंजेक्ट करण्याची आवश्यकता असते. ती रुग्णाची इम्युनिटी दाबून ठेवते. मधुमेहाच्या रुग्णाला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका राहण्यामागील हेच एक प्रमुख कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड -19 चा संसर्ग झालेल्या मधुमेहींना रूग्णालयात दाखल व्हावे लागण्याचा धोका असतो. त्याव्यतिरिक्त श्वसन, ह्रदय आणि फुफ्फुसाशी संबंधित जुन्या व्याधी डोके वर काढू शकतात.
मधुमेहींमध्ये कोरोनाची लक्षणे
1. त्वचेवर डाग आणि सूज येणे
दुसऱ्या लाटेत कोरोनाची आणखी लक्षणे दिसू लागली आहेत. त्यात त्वचेमध्ये संसर्ग, लाल डाग, सूज, तोंड येणे आदी लक्षणांचा समावेश आहे.
2. न्यूमोनिया
अधिक प्रमाणात सूज आणि अनियंत्रित ब्लड ग्लूकोजमुळे मधुमेह असणाऱ्या कोरोना रुग्णांना न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. अशा लोकांच्या शरीरात विषाणू सहज शिरकाव करतो आणि मोठ्या प्रमाणावर नुकसानही करतो.
3. ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळीत घट
कोरोना झालेल्या मधुमेहींसाठी हा एक चिंतेचा विषय आहे. अशा रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेताना त्रास, पल्मोनरी समस्या, छातीत वेदना होणे यांसारखे धोके असतात.
4. ब्लॅक फंगस इन्फेक्शन किंवा म्युकर मायकोसिस
कोरोना रुग्णांमध्ये आढळलेल्या या नव्या संसर्गाने आरोग्य यंत्रणेची चिंता प्रचंड वाढवली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्टेरॉयडमुळे ब्लॅक फंगस निर्माण होऊ शकतो आणि मधुमेहाच्या रुग्णांना म्युकर मायकोसिसचा अधिक धोका आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या रुग्णांना इन्सुलिन घ्यावे लागतात. त्याचा इम्युनिटीवर आघात होतो. हा फंगसला शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग ठरतो. (Four new symptoms of corona that diabetics need to be aware of)
BATA ची जबाबदारी आता गुंजन शाह यांच्या खांद्यावर; ब्रिटानियातही होते CCO#BATA #BATAIndia #Footwearseller #GunjanShah #Hush #Pippieshttps://t.co/nZTNOtZSVP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021
इतर बातम्या
Video | “आजही देवाकडे जास्त न बघता आईकडे बघतो,” मातेची आठवण येताच राज्यातील मोठा मंत्री गहिवरला
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, आज 34 हजार 848 कोरोनाबाधित सापडले