लग्नात 7 नव्हे 4 फेरे, कोणत्या समुदायात ही प्रथा?; कारण मात्र अत्यंत रोचक
हिंदू धर्मात सात फेऱ्यांची प्रथा प्रसिद्ध असली तरी, काही समुदाय चारच फेरे घेतात. या लेखात चार फेऱ्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा शोध घेतला आहे. शीख आणि राजपूत समुदायांमधील चार फेऱ्यांच्या परंपरांचे विश्लेषण केले आहे आणि त्यांच्या मागील कारणांचा उलगडा केला आहे. लेखात चार फेऱ्यांच्या प्रत्येक फेऱ्याचे प्रतीकात्मक अर्थ स्पष्ट केले आहेत.
हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जगभरातच विवाहाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. या निमित्ताने नवदाम्पत्य नवीन आयुष्याला सुरुवात करतात. लग्नातील प्रथा अत्यंत रोचकही असतात. प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या प्रथा आणि रितीरिवाजही वेगवेगळे असतात. हिंदू धर्मात लग्नाच्यावेळी वधू आणि वर सात फेरे घेतात. पण काही समुदाय आणि ठिकाणे असे आहेत की तिथे सात ऐवजी चार फेरे घेतले जातात. त्यामागची कारणंही अत्यंत रोचक आहे. शिवाय या चार फेऱ्यांना धार्मिक मान्यताही आहे.
पुजाऱ्यांच्या मते पारस्कार गृहसूत्र आणि यजुर्वेदात चार फेऱ्यांचाच उल्लेख आहे. चार फेरे घेतल्यावर सात वचनं घेतलीजातात. पण लोकांनी चार ऐवजी सात फेरे घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार अनेक ठिकाणी लग्नाच्यावेळी चारच फेरे घेतले जातात. तर प्रथा, परंपरा आणि रिजीरिवाजानुसार काही लोक सात फेरे घेतात.
चार फेऱ्यांचं महत्त्व काय?
शीख समुदायात लग्नाच्यावेळी वधू वर केवळ चार फेरे घेतात. चार फेरे घेतल्यानंतर विवाह संपन्न होतो. चार फेऱ्यातच वर आणि वधू वैवाहिक जीवनााशी संबंधित गोष्टी जाणून घेतात असं म्हटलं जातं. शीख समुदायात दिवसा लग्न होतं. यावेळी वधूपिता केशरी रंगाची पगडी परिधान करतात. या पगडीचा एक सिरा नवरदेवाच्या खांद्यावर आणि दुसरा सिरा नवरीच्या हातात दिला जातो. वर आणि वधू गुरू ग्रंथ साहिब मध्ये ठेवून चार फेरे घेतात. चार फेरे घेत असताना तीन फेऱ्यांवेळी नवरी पुढे असते. शेवटच्या आणि चौथ्या फेऱ्यावेळी नवरदेव पुढे असतो आणि नवरी मागे असते.
चार फेऱ्यांचा अर्थ काय?
या चारही फेऱ्यांचं शीख धर्मात अत्यंत महत्त्वाचं महत्त्व आहे. पहिला फेरा हा धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो. वैवाहिक जीवनात धर्माशी कधी तडजोड करायची नाही, असं हा फेरा सांगतो. दुसऱ्या फेऱ्यात मर्यादित धनसंपत्तीत सुखी राहणे आणि ज्ञानावर भर देण्याची शिकवण दिली जाते. चौथ्या फेऱ्यात कामाशी अवगत केलं जातं. तर चौथ्या फेऱ्यात वधू-वरांना मोक्षाबाबत माहिती दिली जाते.
या समुदायातही होतात चार फेरे
शीखच नव्हे तर इतर समुदायातही लग्नाच्यावेळी चार फेरे घेतले जातात. राजस्थानच्या राजपूत घराण्यांमध्ये चार फेरे घेण्याची परंपरा आहे. याबाबतची एक कहाणीही आहे. राजस्थानचे प्रसिद्ध लोक देवता पाबूजी राठौड यांच्या विवाहा दरम्यान एका बुजुर्ग महिलेची चोर गाय घेऊन पळाल्याची अचानक माहिती मिळाली. त्यामुळे पाबुजी यांनी चार फेऱ्यातच लग्न आटोपलं आणि गाईचे रक्षण करण्यासाठी निघून गेले. त्यामुळे राजस्थानातील राजपूत घराण्यात सात ऐवजी चार फेरे घेण्याचीच परंपरा सुरू झाली. देशातील अन्य राज्यातही लग्नात 7 ऐवजी चार फेरे घेण्याची परंपरा आहे.