Friendship Day 2024: ‘फ्रेंडशिप डे’ची सुरुवात कशी झाली ? काय आहे इतिहास

भारतात मैत्रीचे मोठे महत्व आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचा दाखला भारतात दिला जातात. कृष्ण आणि सुदामाची मैत्री इमानदारी, त्याग आणि सम्मान याचे मिश्रण आहे.

Friendship Day 2024: 'फ्रेंडशिप डे'ची सुरुवात कशी झाली ? काय आहे इतिहास
frienship day 2024Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 9:33 PM

मित्र आपले आयुष्य वाढवितात, त्यामुळे आपण एकटे असताना मित्र आपल्या मदतीला येतात. त्यामुळे प्रत्येक मित्र महत्वाचा असतो. आपण मित्रांजवळ आपले सुख आणि दु:ख शेअर करीत असतो. मैत्रिचे नाते रक्ताचे नसले तरी रक्ताच्या नात्याहून अधिक मोठे आणि महत्वाचे असते. त्यामुळे वर्षातील एक दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. परंतू ‘फ्रेंडशिप डे’ का साजरा केला जातो. त्याची सुरुवात कशी झाली ? चला तर पाहूया ‘फ्रेंडशिप डे’ची सुरुवात कशी झाली ते पाहूयात…

एका सच्चा मैत्रीची सुरुवात जीवनात आपल्याला यशस्वी बनविते. मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील 4 तारखेला फ्रेंड शिप डे साजरा केला जातो.परंतू त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली हे बहुतेकांना माहिती नाही.

‘फ्रेंडशिप डे’ची सुरुवात कशी झाली ?

फ्रेंडशिप डेची सुरुवात कशी झाली यावरुन अनेक अख्यायिका आहेत. असे म्हटले जाते की 1935 मध्ये अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीला मृत्यूदंड झाला होता. ही बातमी कळल्यानंतर त्याचा मित्राने देखील जीव दिला, ‘फ्रेंड शिप डे’ची ही कहाणी या घटनेनंतर सुरुवात झाली.जीवनात मैत्रीचे महत्व कळण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास ?

30 जुलै 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव पराग्वे येथे आला. त्यानंतर अनेक वर्षांनंतर साल 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघात 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याची घोषणा झाली. तरीही अमेरिका, भारत, बांग्लादेश सारखे देश फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करतात. जगभरात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्रीचा हा सण साजरा केला जात असतो.