1 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून बदलणार हे नियम, आधार कार्डविषयी हे नियम जाणून घ्या, फायदा होईल
इन्कमटॅक्स भरणाऱ्यासाठी जसा मार्च महिना महत्वाचा त्याचप्रमाणे सप्टेंबर हा महिनाही महत्वाचा आहे. सप्टेंबर महिन्यातही काही महत्वाचे आर्थिक व्यवहार संदर्भात काही महत्वाचे बदल होत असतात. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यातही काही महत्वाचे बदल होणार आहेत. काही नवीन नियम जाहीर होणार आहेत.
मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | काही नवीन नियम आणि त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात महिन्याच्या 1 तारखेला होत असते, ऑगस्ट 2023 चा महिना आज संपणार आहे, 1 सप्टेंबर 2023 हा दिवस काही नियम आणि अटी बदलवण्यासाठीही उगवणार आहे असं म्हणता येईल, कारण उद्यापासून आर्थिक बाबतीत अनेक बदल होणार आहेत, ते आपण माहिती करुन घेणे गरजेचे आहे.
सप्टेंबर महिन्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे, 1 तारखेला हे नवीन नियम सर्वांसाठी नवीनच आहेत. या नियमांचा परिणाम किचन आणि शेअर बाजारातील गुंतवणूक आणि तुमच्या खिशावर देखील चांगला वाईट परिणाम करणारी ठरणार आहे. नोकरदारांवर याचा मोठा फरक दिसणार आहे. टेक होम सॅलरी काही लोकांची वाढली तर आश्चर्य वाटू देऊ नका.
स्वयंपाकाचा गॅस सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, यात गृहिणींचा जीव अडकलेला असतो, स्वयंपाकाच्या गॅसचा भाव वाढल्यावर ते चिंता व्यक्त करतात. पण महिन्याच्या प्रत्येक पहिल्या तारखेला ऑईल आणि गॅस वितरक कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलल्या तर त्यावर अंमलबजावणी करतात. एवढंच नाही, सीएनजी, पीएनजी, एअर फ्यूल यांच्या किंमतीत देखील बदल होणार आहे, याचा परिणाम प्रवास खर्च वाढण्यावर नक्कीच होवू शकतो, अनेक शहरात बस आणि टॅक्सी सेवा ही सीएनजीवर चालते, यानंतर प्रवासी भाडे वाढीची मागणी देखील होते.
आयकर विभागाकडून रेन्टफ्री आकोमोडेशनशी संबंधित नियमात १ सप्टेंबर २०२३ पासून बदल होणार आहे. टॅक्स पेअरसाठी किंवा इन्कमटॅक्स भरणाऱ्यांनी ही बाब समजून घेणे महत्वाची ठरणार आहे. बँके संबंधित तुमची काही कामं असतील तर ती वेळेवर या महिन्याच्या सुरुवातीला करुन घ्या, कारण या महिन्यात सर्व राज्यांमधील वेगवेगळे नियमांनुसार १६ दिवस बँक हॉलिडे असणार आहे. याविषयी अधिक माहिती तुम्ही बँकेत जावून घ्या.
आणखी एक गुलाबी आणि महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, सर्क्युलेशनच्या बाहेर गेलेली २ हजार रुपयांची नोट, म्हणजे जी नोट आता व्यवहारात बाद झाली आहे, ती बँकेत जमा करण्यासाठी सप्टेंबर हा महिना शेवटचा असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीमध्ये आधारकार्ड अपडेट कऱण्याचा हा शेवटचा महिना आणि शेवटची संधी आहे, असं म्हणता येईल. 1 सप्टेंबर २०२३ पासून जे शेअर बाजारात आयपीओ येतील त्यांचा लिस्टिंग टायमिंगचा नवा नियम स्वच्छेवर असणार आहे, सेबीने मागील 28 जूनला बैठकीत T+3 ला मंजुरी दिली होती.